परभणी जिल्ह्यात गरीब,मजुरी करणाऱ्या  नागरिकांना जीवनावश्यक वस्तू शासनामार्फत मोफत वाटप करण्याची रिपब्लिकन सेनेची मुख्यमंत्र्याकडे मागणी

 


 


परभणी जिल्ह्यात गरीब,मजुरी करणाऱ्या  नागरिकांना जीवनावश्यक वस्तू शासनामार्फत मोफत वाटप करण्याची रिपब्लिकन सेनेची मुख्यमंत्र्याकडे मागणी


पूर्णा येथील  तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री यांना लेखी  निवेदनाद्वारे परभणी जिल्ह्यात संचारबंदी व लॉकडाउन च्या उद्भवलेल्या परस्थितीत परभणी जिल्ह्यात गरीब,मजुरी करणाऱ्या  नागरिकांना जीवनावश्यक वस्तू शासनामार्फत मोफत वाटप करण्याची रिपब्लिकन सेनेने मुख्यमंत्र्याकडे मागणी केली आहे.


कोरोनाव्हायरस मुळे भयभीत झालेल्या गोरगरीब रोज मजुरी करणारे असंख्य नागरिक जीवनावश्यक वस्तू अन्नधान्यापासून तसेच आर्थिक व्यवहारापासून वंचित असलेल्या नागरिकांना शासना मार्फत त्वरित अन्नधान्य सामग्री उपलब्ध करून द्यावेत.
 सध्या स्थित आंतरराष्ट्रीय व देशात  व राज्यात त्याच बरोबर जिल्ह्यात उद्भभलेल्या कोरोना साथीमुळे संपूर्ण महाराष्ट्र भयभीत झालेला आहे  परभणी जिल्हा अति मागासलेला म्हणून शासन दरबारी नोंद आहे  जिल्ह्यात असंख्य गोरगरीब रोज मजुरी करणारे शेतकरी वर्गा सह असंख्य नागरी अन्न धान्यापासून वंचित झाले आहेत आशा बिकट परिस्थितीत लाखो नागरिकांना उपाशी राहण्याची वेळ आली आहे. या संकटावर मातकरण्यासाठी उपाययोजना म्हणून मा पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी जनतेला आवहान करून  सांगितले की आम्ही देशवासीयांना लॉकडाऊन च्या कार्यकाळात उपाशी राहू देण्याची वेळ येऊ देणार नाही प्रत्येक व्यक्तीला तीन महिन्यापर्यंत मोफत जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य व गॅस सिलेंडरची व्यवस्था करण्यात आली आहे असे जाहीर केले पण 
करून नागरिकांना जीवनावश्यक वस्तू चा साठा उपलब्ध करून दिला आहे यामुळे नागरिकावर उपासमारीची वेळ येणार नाही असे आश्वासन देऊनही आज पावतो पर्यंत देशात लॉकडाऊनला  दहा दिवस उलटूनही अंमलबजावणी अद्यापही झाली नाही. 


जिल्ह्यातील जनतेत प्रचंड प्रमाणात उद्रेक निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही?
 
 जिल्हा प्रशासनास भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता प्रशासन अधिकारी म्हणाले शासनाकडून कोणतेही अन्नधान्य मोफत सामग्री देण्याचे आदेश मिळालेले नाही  जेव्हा आम्हास शासनाचे आदेश मिळाल्यास मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देऊत अशा प्रमाणे प्रतिउत्तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेले आहे अशी माहिती सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.


 जिल्ह्यातील जनता भयभीत होऊन  कठोर यातना भोगत आहे यातच संचारबंदीमुळे नागरिकांच्या हाताला काम नाही,पैसा नाही, खाण्यासाठी अन्न  नाही. यामुळे कोरोना साथीपेक्षाही भयानक जीव घेनी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.या उद्भभणाऱ्या परिस्थितीला जबाबदार कोण? अशा प्रश्न सुर्यवंशी यांनी विचारला आहे.
 नागरिक पोटाची भूक भागवीण्याकरता घराबाहेर पडल्यास पोलीस प्रशासनाकडून अमानुषपणे नागरिकांवर लाठीचार्ज केला जात आहे. (यालाच म्हणतात बाप भीक मागू दे ना माय जेवण देईना )अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.


 सरकाने तात्काळ पावले उचलून एप्रिल २०२०च्या पहिल्या आठवड् पर्यंत गरीब , मजूर, गरजू नागरिकांच्या घरापर्यंत मोफत जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य सामग्री अर्थसहाय्य त्वरित वाटप करण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन सेना परभणी जिल्हा अध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी यांनी केली आहे. तसे  न झाल्यास रिपब्लिकन सेनेच्या वतीने जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात  आलेला आहे.