शहरात कोरोनाच्या संसर्ग बढतीचा वाढता आलेख नवीन पाच रुग्ण बाधित

 


 


शहरात कोरोनाच्या संसर्ग बढतीचा वाढता आलेख


नवीन पाच रुग्ण बाधित


मीरा-भाईंदर मधील कोरोना विषाणूची लागण झालेली संख्या वाढली आहे आजच्या दिवसात नविन ५ रुग्ण बाधित आढळून आले आहेत त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.


मीरा भार्इंदर महापालिकेने जारी केलेल्या आकडेवारी नुसार कोरोना रुग्णांची संख्या ८ वरुन १३ वर पोहचली आहे. नव्याने पाच रुग्णांना लागण झालेली आहे. आज ५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत त्यांचे खाजगी लॅबचा तपासणी (चाचणी) अहवाल कोरोनाची लागण झाल्याचा आला आहे कस्तुरबा रुग्णालयाचा चाचणीअहवाल येणे बाकी आहे. शहरात कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याने शहरात चिंता वाढली आहे . नागरिकांनी पालिका व शासनाच्या सुचनांचे काटेकोर पालन न केल्यास शहरात कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण होईल अशी जाणकारांचे मत तयार झाले आहे.


विनाकारण गर्दी आणि निष्काळजी पणाचा परिणाम शहरात जाणवत आहे. जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या, विक्रीच्या नावाखाली फिरणारे जास्त आहेत. त्याच बरोबर शहरातील नागरिकांनी अनावश्यक घरा बाहेर पडणे हे धोक्याचे आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. घराच्या बाहेर पडू नये अशी विनंती शासनाच्या वतीने वारंवार करण्यात येत आहे.


मीरा-भाईंदर शहरातील ५ एप्रिल पर्यंतची कोरोनाची आकडेवारी अशी आहे. पडताळणी केलेल्या ८२५ रुग्णांमधील ३० जण नव्याने आढळुन आलेले आहेत. यातील ३०५ जणांनी १४ दिवसांचा अलगीकरणाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. ५२० जणांना अलगीकरण केले असुन त्यापैंकी ४३९ जण घरातच असून ४१ जण महानगरपालिकेच्या अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहेत. ८६ जणांचे नमुने कोरोना चाचणीसाठी पाठवले त्यापैकी ३९ जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर ३४ जणांचे अहवाल अजुन येणे बाकी आहे. त्यांना अलगिकरण कक्षात ठेवले असल्याची माहिती मीरा भाईंदर मनपा कडून मिळते आहे.