महानगरपालिकेच्या परिचारिकाचा रुग्णांना तपासण्यास नकार; रुग्णामध्ये भीतिचे वातावरण

महानगरपालिकेच्या परिचारिकाचा रुग्णांना तपासण्यास नकार; रुग्णामध्ये भीतिचे वातावरण



मीरारोड पूर्व : 


         कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेर देशातुन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिची वैद्यकीय तपासणी करुनच नंतर त्याना घरी पाठवले जात असताना मात्र मीरा भाईंदर मधील महानगर पालिकेमार्फ़त तपासणी करणाऱ्या परिचारिका बाहेरुन आलेल्या रुग्णाची तपासणी करण्यास नकार देत असून खाजगी लॅब मधून तपासणी करण्यास सांगत असल्याने वैद्यकीय सेवा याला अपवाद ठरत असल्याचे एका तरुणीने समोर आणले आहे .
     फ्रांसला काही कामानिमित्त गेलेल्या २ तरुणी 17 मार्चला भारतात परत आल्या.बाहेर देशातुन आल्यावर त्याची तपासणी केल्या नंतर त्यांना घरात अलगिकरण करण्यात आले होते .त्यातील 1 तरुणी भाईंदरच्या नवघर रोड  येथे राहणारी तर दुसरी ठाण्याची होती . 31 मार्चला त्यांचा  14 दिवसांचा कार्यकाल  संपला होता . मात्र तरीदेखील ठाण्याच्या  तरुणींनी 3 एप्रिलला  आपली तपासणी ठाण्याच्या एका खाजगी रुग्णालयात केली असता तिला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले . म्हणून मिरा भाईंदर मधील तिच्या मैत्रीणीने घाबरून आपली देखील तपासणी करण्याचे ठरवले व तपासणी करण्यासाठी महालिकेच्या परिचारिकेशी  संपर्क केला व आपल्याला तपासणी करायची असून त्यासाठी मी येऊ का असे विचारले असता तिला खाजगी रुग्णालयातून तपासणी करण्यासाठी सांगण्यात आले  व महापालिका तपासणी करणार नाही असे सांगण्यात आले . खाजगी रुग्णालयात तपासणी करण्यासाठी डॉक्टरचे पत्र लागत असल्याने शहरातील सर्व दवाखाने बंद असल्याने तरुणी घाबरली होती .अनेकांनी तरुणीला मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग,आयुक्त, उपआयुक्त यांच्याशी संपर्क साधन्यास सांगितले. तरुणीची मदत करण्यासाठी अनेकांनी स्वता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पडवळ व उप आयुक्त संभाजी पाणपट्टे याना फोन केले पण फोन पण उचलत नसल्याने लोकांना वैद्यकीय सेवे बाबत माहिती मिळत नसल्याने चुकीचा भ्रम निर्माण  होत आहे.पालिकेने अश्या गैर जबाबदार लोकांवर कारवाई करावी. अखेर तरुणीने मित्रांशी संपर्क केला असता परिचित व्यक्तीने पालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली व त्यानंतर महापालिकेच्या डॉक्टरांनी संपर्क केला व रविवारी तिला टेंबा रुग्णालयात हलविण्यात आले . परिचारिका मात्र रुग्णांची दखल घेत नसल्याचे पहायला मिळाले.