कोरोना बाधितांची शहरातील संख्या पोहचली ३६
भाईंदर - मीरा-भाईंदर मध्ये कोरोना बाधितांची संख्या आता ३६ वर गेलेली आहे काल पर्यंत ही संख्या ३२ वर होती त्यात आता आणखी ४ ने वाढ झाली आहे. घरातीलच कोरोना संक्रमण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे ते त्यांनाही कोरोनाचे संक्रमण झालेले आढळून आले आहे. त्यामुळे मीरा-भाईंदर मधील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ३६ झाली आहे.
मीरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनाकडून दिलेल्या अधिकृत माहितीनुसार शहरात आढळून आलेल्या रुग्णात भाईंदर पूर्व गोडदेव येथील ४९ वर्षांची महिला आणि १९ वर्षाच्या मुलाचा ससमावेश आहे. यांच्या घरातील एक व्यक्ती अगोदरच कोरोना बाधित झाली होती. त्याच्या संपर्कात आल्यामुळेच हे दोघे बाधित झाले आहेत. तसेच नयानगर, लोढा कॉम्प्लेक्स येथील एक १५ वर्षीय मुलगी आणि याच परिसरातील पूजा नगर येथील एक ४८ वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आलेली आहे. या दोघींच्याही घरातील व्यक्ती याआधी कोरोना बाधित निघालेल्या आहेत. पालिकेने आज ५९ व्यक्तींची ओळख पटवली. ओळख पटविलेल्या लोकांची संख्या आता १०११ झाली आहे. यात १४ दिवसांचा कॉरंटाईन कालावधी पूर्ण केलेल्यांची संख्या ३७१ इतकी आहे. ६४० व्यक्ती निरीक्षणाखाली आहेत. यात होम कॉरंटाईन ४७३, पालिकेच्या कॉरंटाईन सेल मध्ये १०८, विलगिकरण कक्षात ५९. निरीक्षणासाठी पाठवलेले एकूण स्वॅब २०३ यातील ३६ पॉझिटिव्ह, ९७ निगेटिव्ह आणि ७० प्रतिक्षेत आहेत. आजवर एकूण २ व्यक्ती पूर्ण बऱ्या झाल्या आहेत, तर २ जणांचा मृत्यु झाला आहे.