जितेंद्र आव्हाड यांना मंगळवारी रात्री उशिरा हॉस्पिटलमध्ये केले दाखल
जितेंद्र आव्हाड जनतेत नेहमी राहणारे नेते म्हणून ओळखले जातात त्यांचा दांडगा संपर्क आणि कार्यकर्ते यांच्यात असलेले जिव्हाळ्याचे नाते हे नेहमीच आव्हाडानां बळ देणारे ठरते आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग काळात ही नागरिकांच्या मदतीला धावून सेवा करण्याची भावना ठेवत परिसरातील लोकांच्या मदतीला जाताना त्यांना कोरोनाच्या संसर्ग ची लागण झाली असल्याची दाट शक्यता आहे अशी चर्चा सुरू आहे.
राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना मंगळवारी रात्री उशिरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
रात्री जितेंद्र आव्हाड यांना मंगळवारी अचानक खूप ताप आला आणि त्याचबरोबर श्वास घ्यायलादेखील त्रास होत होता. त्यामुळे त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर नावाच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण सदर हॉस्पिटलकडून मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिल्याचं समजतं.
आणि त्यांना मुलुंड येथील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. आव्हाड यांच्यावर सध्या मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांना कोव्हिड-19 ची लागण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतरही जितेंद्र आव्हाड त्यांच्या मतदारसंघात फिरत होते. त्यांच्या आसपासच्या लोकांना कोरोनाची लागण झाल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी १३ एप्रिलला घरी स्वत:ला १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करून घेतलं होतं.
त्यावेळी कोरोनाची चाचणी केली आहे आणि ती निगेटिव्ह आल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं होतं. पण या क्वारंटाईन काळात आठव्या दिवशीच त्यांना ताप आणि श्वासाचा त्रास जाणवू लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी काही जणांना तसंच आव्हाड यांच्यासोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याला कोरोनाची झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे कोरोनाचा संसर्गजन्य रोग असल्या मुळे त्याची लागण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अधिकृत सूत्रांकडून माहिती समोर अद्याप आलेली नाही.