दुकानदारांकडून जीवनावश्यक वस्तूंची विक्री कुठे अधिक तर कुठे दुप्पट दराने, ग्राहकांची लूट
मीरारोड पूर्व : कोण,कोणत्या परस्थिती फायदा घेऊन कोणाला लुटेल हे सांगता येत नाही. देशात पसरलेली कोरोना रोगाची साथ त्यामुळे सुरू असलेली संचारबंदी व लॉकडाउनमध्ये लोकांना आर्थिक परिस्तिथिशी सामना करावा लागत असतानाच मीरा भाईंदर मधील काही किराणा दुकानांत चढ्या भावाने तर कुठे कुठे दुप्पट भावाने धान्य व इतर जीवनावश्यक वस्तुंची विक्री केली जात आहे. यावर कोणाचाही अंकुश नसल्याने नाइलाजाने लोक त्यांची खरेदी करत आहेत. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली काळा बाजार सुरु असल्याचे लता देशमुख यांनी सांगितले. ही महिला समान आणण्यासाठी दुकानात गेली असता चक्क दुप्पट भावाने वस्तू विकत असल्याचे तिच्या लक्षात आले पण पर्याय नाही म्हणून सामान विकत घेतली बिल मागितले गेले तर बिल मिळणार नाही तुम्हाला हवे असेल तर घ्या अन्यथा निघून जा असे उद्धट उत्तरे दुकानदारांकडून दिली जात आहेत.
लता देशमुख या वयोवृद्ध महिलीने हा दुकानदारांनाकडून केला जात असलेला फसवणुकीचा प्रकार उघडकीस आणला आहे.
सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे ठिकठिकाणच्या किराणा दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी होवु लागली आहे. रोजच्या जीवनातील गरजु वस्तुंची वाढती मागणी हेरून दुकानदारांनी त्याचे दर वाढवल्याने ग्राहकांना पर्याय नसल्याने जास्त रक्कम मोजून ते नाईलाजास्तव खरेदी करावे लागत आहेत.एक कीलो व्हील पावडर ५१ रुपये किंमत असताना दुकानदार त्याच्या किंमतीत ३६ रुपये अधिक वाढ करुण ग्राहकाना ८४ रूपयाना विकत असल्याचे समोर येत आहे .
रामदेव पार्क येथील लाईफ लाईन मेडिकलच्या बाजूला असणाऱ्या किराणा दुकानाचा मालक गेल्या कित्येक दिवसांपासून लोकांना स्टॉक संपुष्टात आल्याचे सांगत असून नंतर जास्त पैसे आकारुन विकत आहे . मीरा भाईंदर मधील काही दुकानदार आपल्या फ़ायदयासाठी लोकांची फसवणूक करून किंमती पेक्षा अधिक पैसे आकारुन अन्न धान्याची विक्री करत आहेत.
शहरातील अनेक भागात मिरारोड, काशीमीरा, भाईंदर या परिसरातील दुकानदार हे ग्राहका कडून सर्रासपणे किमतीपेक्षा जास्त दर तर काही वस्तु दाम दुप्पट करून विकत आहेत. सरकार कडून दुकानदारांवर अंकुश ठेवण्याच्या उपाययोजना नाहीत. अशा दुकांनदारावर कडक कारवाई करता येईल अशा पर्याय उपलब्ध नाही. जनतेतून कडक कारवाई ची मागणी करण्यात येत असतांनाही. अशा दुकांनदारावर कारवाई करत नसल्यामुळे दुकानदार हे ग्राहकांची लुटमार करत आहेत. अशी मागणी शिवमावळा प्रतिष्ठान कडून चे केली आहे.
प्रतिक्रिया :
आम्ही नेहमी याच दुकानातुन किराणा सामान भरतो मात्र सध्याच्या परिस्तितीचा फायदा उचलत दुकानदार हे वस्तुंच्या किमतिमध्ये ४० रुपये अधिक वाढवून विक्री करत आहेत.
लता देशमुख ( रहिवासी/ ग्राहक )
प्रतिक्रिया
ग्राहकांची लूट करणाऱ्यावर मनपाने लक्ष देणे गरजेचे आहे.पहिलाच अर्थिक मंदीचा फटका, त्यात लॉकडाउन, लोकानच्या हातात येत नसलेला पैसा त्यामुळे सामान्य माणूस हवालदिल झालेला आहे. त्यात दुकानदारांकडून होत असलेली लूट ही माणुसकीला, आणि व्यवहाराला मातीत गाढणारी आहे. दुकानदारांनी वाईट काळाचा फायदा उचलू नये असे आवाहन प्रयास फाउंडेशन ने शहरातील दुकानदारांना केले आहे.
(नितेश सिंग : अध्यक्ष- प्रयास फाउंडेशन)