उत्कृष्ट सेवा देणाऱ्या पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या पाठीवर पडणार राज्यसरकारची कौतुकाची थाप (पोलिस मदत पत्र)

 उत्कृष्ट सेवा देणाऱ्या पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या पाठीवर पडणार राज्यसरकारची कौतुकाची थाप


कोरोनाचे संकट दूर होताच या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना योग्य ते पारितोषिक देऊन केला जाणार सन्मान 


भारतात कोरोनाची साथीचे वाढते संक्रमण थांबवण्यासाठी सरकारने २१ दिवसाचे लॉकडाउन घोषित केले आणि देशात एकच खळबळ माजली त्याचा ताण पोलिस प्रशासनावर पडला  त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसदल सुसज्ज झाले अहोरात्र मेहनत घेत देशातील नागरिकांची सुरक्षा हेच प्रथम कर्तव्य डोळ्यासमोर ठेऊन स्वतःची, परिवाराची काळजी न करता संयम ठेऊन जनहितार्थ चांगले काम करणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडणार आहे.


 


कोरोनाच्या काळात पोलिस दलातील जे अधिकारी आणि कर्मचारी यांनी उत्कृष्ट पणे कामगिरी बजावली याची दखल राज्य सरकारने घेतली जाणार आहे. राज्यसरकार कोरोना संकट दूर होताच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस दलातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामगिरी मुळे पाठीवर कौतुकाची थाप मारण्यात येणार आहे. या संदर्भात अहवाल तयार करून तो गृहमंत्रालयाला पाठविण्यात येणार आहे. उत्कृष्ट पणे सेवा देणाऱ्यांना बक्षिस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.


देशांत कोरोना संसर्गाच्या थैमानाला लगाम बसावा म्हणून संचारबंदी करण्यात आली आहे. पण काही टवाळखोर जाणीवपूर्वक वाहतुकीचे व संचारबंदीचे नियम तोडत आहेत.अशावेळी पोलिसांना अशा व्यक्तींविरोधात आक्रमक पवित्रा घ्यावा लागला आहे. त्यामुळे पोलिस टीकेचे धनी ठरले आहेत. तर बऱ्याच जणांनी वाव्हावा देखील केली . काहीही झाले तरीही पोलिस अधिकारी कर्मचारी डोळ्यात तेल घालून अहोरात्र त्यांचे कर्तव्य बजावत आहेत. विशेष म्हणजे पोलिस दलातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्टया रद्द केल्या गेल्या आहेत.


पोलिस दलाच्या प्रमाणिकपणाची व कर्तव्यनिष्ठेची वरिष्ठ अधिकारी आणि राज्य सरकारने वेळोवेळी दखल घेतली आहे. आता लॉकडाऊन काळात उत्कृष्ठ कामगिरी बजाविणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा अहवाल पोलिस आयुक्तांना पाठविण्यास सांगितला आहे. त्याआधारे कोरोनाचे संकट दूर होताच या अधिकाऱ्यांना योग्य ते पारितोषिक देण्यात येणार आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूत्रांकडून मिळत आहे.