जे. पी. इन्फ्रा. चा निर्दयीपणा , निष्काळजी पणामुळे शेकडो कामगार उपाशी,होणार का गुन्हा दाखल ?
(पोलिस मदत पत्र)
ठळक बाबी
■ दोन महिन्यापासून काम करूनही दिला नाही कामगारांना पगार, संचारबंदी लागताच जे. पी. इन्फ्रा ने केले हातवर,
■ ममता बॅनर्जीच्या काळजीवाहू पणामुळे उघडकीस आला जे. पी. इन्फ्राचा कामगारां प्रति दुर्लक्षित पणा.
■ नऊशे च्या पुढे साईटवर आहेत कार्यरत कामगार
■ विकासकांच्या निष्काळजी पणा, आणि दुर्लक्षित पनामुळे अनेक घडल्या विकासकार्य सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी अप्रिय घटना.
■ विकासकांची व्हावी चौकशी अशी वाढते जनतेतून मागणी.
■ आता पर्यंत घडलेल्या विकसित करण्यात येत असलेल्या ठिकाणी झालेल्या अपघाताची करावी पुन्हा चौकशी कामगार कामगारांतुन उमटत आहे सूर.
■ टळली उपासमारीची वेळ विकासकाने कामगारांना सोडले वाऱ्यावर .
■ कामगारांच्या मदतीसाठी प. बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेकडे मागितली मदत.
मिरारोड - काशीमीरा भागातील घोडबंदर जवळील जे. पी. इन्फ्रा या विकासकाने जसे सरकारने लॉकडाउन घोषित केले तसे आपल्या कामगारांना वाऱ्यावर सोडल्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे समोर आले. जिव वाचवण्यासाठी कामगारांनी पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री ममता यांच्याकडे मदत मागितली तेव्हा त्यानीं तात्काळ दखल घेत पश्विम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्र शासनाकडे कामगारांच्या मदतीची मागणी केल्यानंतर हा प्रकार उघड झाला प्रशासनाकडून गंभीर दाखल घेण्यात आली.
मिरा रोड परिसरातील हडकेश घोडबंदर रस्ता येथे लागूनच जे. पी. इन्फ्रा. या विकासकाच्या इमारत निर्मितीचे कामं गेल्या दीड वर्षांपासून सुरु आहे. या इमारतीच्या निर्मितीसाठी अनेक कामगार हे काम करत आहेत. जास्त प्रमाणात कामगार हे पश्विम बंगाल येथून आलेले आहेत. गेल्या काही दिवसा पासून राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पूर्ण देशात संचारबंदी लागु करण्यात आलेली आहे. त्यामुळे कामगारांना त्या भागातच झोपडी बांधून राहण्याची वेळ आली आहे. त्यांच्याकडे विकासक जे.पी.इन्फ्राने देखील गेल्या काही दिवसापासून दुर्लक्षपणा केला आहे. त्यांना खाण्यासाठी अन्न धान्य उपलब्ध होत नाही त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली असल्याचा प्रकार समोर आला आहे. या कामगारांनी त्यांच्या गावी फोन करून मदत मागीतली. त्यांच्या मदतीला पश्विम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हया धावून आल्या आणि त्यानी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे त्या कामगारांना मदत करण्यासाठी फोन केला तेव्हा हा प्रकार उघडकीस आला आहे. बॅनर्जी यांनी कामगारांना अन्न साठा पुरवण्याची मागणी केली असल्याचे समोर आले आहे.
मुख्यमंत्री यांनी त्याची तत्काळ दखल घेत त्या विभागाचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना कामगारांची मदत करण्याचे सांगितले. तेव्हा सरनाईक यांनी कामगारांची भेट घेतली. या कामगारांना विकासकाने गेल्या २ महिन्यापासून पगार देखील दिला नसल्यामुळे त्यांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे देखील शक्य नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कामगारांना राज्य शासनाकडून जेवण आणि अत्यावश्यक सेवा पुरविण्यासाठी सरनाईक यांनी कामगार विभागाकडे मागणी केली.त्यानंतर संतोष गोसावी या कामगार अधिकाऱ्यांनी कामगारांची भेट घेऊन त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे.