शंकर नारायण महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रक्ताचा तुतवडा कमी झाल्याने रक्तदानाचे सर्वांना आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत भाईंदर पूर्वच्या शंकर नारायण महाविद्यालय व लोकमान्य लघु उद्योग असोसिएशन, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालय परिसरात शुक्रवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 51 जणांनी रक्तदान केले. शिबिरात शिक्षक,विद्यार्थी परिसरातील सुजाणु
नागरिक,माजीविद्यार्थी,शिक्षक,कर्मचारी,सामाजीक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
शंकर नारायण एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष रोहिदास पाटील यांनी रक्तदान शिबिरात भाग घेतलेल्या सर्वांचे आभार मानले. राष्ट्रीय आपत्तीच्या काळात शंकर नारायण महाविद्यालयाने कायम राष्ट्रसेवेची,जनसेवेची भूमिका घेतली आहे. शासनाच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत महाविद्यालयाच्या सर्व घटकांनी या शिबिरास उत्तम प्रतिसाद दिला असे रोहिदास पाटील यांनी सांगितले. या शिबिरास प्रवीण पाटील तंत्रानिकेतनाच्या प्राचार्या रंजना पाटील,संस्थेचे सचिव महेश म्हात्रे,हितेंद्र पाटील,सुबोध पाटील,प्रा.सुनील धापसे,अमोल बावस्कर यांनी विशेष परिश्रम घेतले.