दिल्लीत तबलिगी जमातिच्या कार्यक्रमात मीरा-भाईंदर मधूनही काही जणांचा सहभाग
मीरारोड - देशात कोरोनाची साथ मोठ्याप्रमानात पसरत असतानाच दिल्लीच्या निजामुदद्दीन भागात झालेल्या तबलिगी जमातीत अनेक परदेशातून आलेले नागरिक सहभागी झाले होते या मुळे, या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेलेल्या नागरिकांना कोरोनाच्या संक्रमनाची भीती असल्यामुळे चिंता पसरली आहे. मीरा-भाईंदरच्या पाच पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पंधरा जण या जमातीत गेले होते. त्यामुळे शहरात चिंता वाढली आहे.
नयानगर ५, नवघर ४, काशिमीरा ३, भाईंदर पश्चिम २ तर मीरारोड १ , असे
असे ऐकून १५ जणं मीरा भाईंदर शहरातून गेले होते. अशी माहिती मिळत असतांना या जमातीतून परत शहरात परतणाऱ्याचीं संख्या मात्र दोनच आहे अशी सूत्रांची माहिती मिळते आहे. तर १३ जणं जमात करून परस्पर आपल्या मुळगावी निघुन गेल्याचा तर काही जणं अनेक महिन्यां पासुन येथे रहात नसल्याची माहिती समोर येत आहे. शहरात आलेल्या दोन जणांना घरीच अलगीकरणात ठेवले असुन पालिका व पोलीस त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहेत.
झालेल्या दिल्लीत मार्च महिन्यात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात सामील झालेल्या पैकी बऱ्याच जणांना कोरोनाची लागण झालेले दिसून आल्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे सदर कार्यक्रमात देशाच्या प्रत्येक भागातुन लोकं आले होते याची माहिती आता त्या त्या भागातील पोलीस व पालिका प्रशासनास दिली जात आहे. त्याअनुषंगाने मीरा भाईंदर मधुन १५ जणं गेल्याची माहिती समोर आली आहे.
पोलीस आणि पालिकेने या १५ जणांची माहिती जाणून घेण्यासाठी पडताळणी केली असता, नवघर पोलीस ठाणे हद्दीत प्रत्येकी एक जणच राहत्या पत्यावर आढळुन आला आहे. बाकीचे राहत्या पत्यावर आढळुन आले नसुन काही जणं अनेक महिन्यां पासुन रहात नव्हते तर काही जण दिल्ली वरुनच आपापल्या गावी निघुन गेल्याचा संशय आहे. नवघर पोलीस ठाणे हद्दीत रहात असलेला इसम हा १३ मार्च ला गेला होता व २१ मार्च रोजी शहरात परतला. तो व नया नगरचा मिळुन दोघाही जणांना त्यांच्या राहत्या घरातच देखरेखी खाली ठेवण्यात आलेले आहे. सध्यातरी या दोघानाही कोरोनाची कोणतेही लक्षणे दिसून आल्याचे आढळुन आलेले नाही, असे सुत्रांच्या माहितीवरून कळते आहे.