मीरा भाईंदर मध्ये सॅनिटायजरची चढ्या भावाने विक्री
मीरारोड पूर्व :
कोरोना या जीवघेण्या व्हायरसने थैमान घातले आहे. त्याचा प्रादुर्भाव इतर देशांतही होऊ लागल्यामुळे कोरोनाच्या भीतीमुळे सॅनिटाइजरच्या मागणीत वाढ झाल्याने मीरा भाईंदर मधील काही मेडिकल दुकानांत चढ्या भावाने सॅनिटाइजरची विक्री केली जात असल्याने सॅनिटाइजरच्या नावाखाली काळा बाजार सुरु असल्याचे सुमित पाटणकर या तरुणाने हा प्रकार उघडकीस आणला आहे.
काही ठिकाणी तर सॅनिटाइजरचा साठा संपुष्टात आल्याचे सांगितले जात आहे . या सॅनिटाइजर वापरण्याच्या सरकारच्या निर्देशामुळे किंवा पालकांची आपल्या मुलां प्रति वाटणारी काळजी यामुळे ठिकठिकाणच्या दुकानांत , मेडिकल मध्ये खरेदीसाठी गर्दी होवु लागली आहे. सॅनिटाइजरची वाढती मागणी हेरून दुकानदारांनी त्याचे दर वाढवल्याने पालकांना आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी जास्त रक्कम मोजून ते नाईलाजास्तव खरेदी करावे लागत आहेत.एका लहान सॅनिटाइजरच्या हैंड वाश लिक्विडची किंमत ४० रुपये असून अनेक ठिकाणी किंमतीत अधिक वाढ करुण विकला जात असल्याचे समोर येत आहे .
रामदेव पार्क येथील रश्मी सिद्धात इमारतीत असणाऱ्या सती मेडिकलचा मालक गेल्या कित्येक दिवसांपासून लोकांना सॅनिटाइजरच्या स्टॉक संपुष्टात आल्याचे सांगत असून नंतर २५० एमएल करता ५५० रुपये आकारत आहे . मात्र याच बाटलीची किमत दुसऱ्या मेडिकल मध्ये ३५० रुपये आहे. मेडिकल एसोसिएशन ने प्रत्येक मेडिकल चालकाला जी कीमत बाटली वर आहे त्याच किमतीत विकण्यास सांगितले असतानाही मीरा भाईंदर मधील काही दुकानदार आपल्या फ़ायदयासाठी लोकांची फसवणूक करून अधिक पैसे आकारुन सॅनिटाइजरची विक्री करत आहेत.
प्रतिक्रिया :
आम्ही दोन ते तीन मेडिकल दुकानात सॅनिटाइजर च्या किमतीची विचार पूस केली मात्र या मेडिकल मध्ये २०० रुपये अधिक वाढवून सॅनिटाइजरची विक्री केली जात आहे.याचे बिल देखील माझ्याकडे आहे.
सुमित पाटणकर ( रहिवासी )