कोरोनाच्या रुग्णांवर होणार आता मीरा-भाईंदर उपचार
देशासह,महाराष्ट्र राज्यात वाढता कोरोना बाधितांचा आकडा तर मीरा-भाईंदर मध्ये कोरोना बाधित रुग्ण मिळून आल्यामुळे पालिक प्रशासन युद्धपातळीवर तयारी करत आहे. शहरातील संख्या ही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून महानगरपालिकेने कोव्हिडं १९ ची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना बाधित रुग्ण, उपचारानंतर बरे होण्याचे प्रमान महाराष्ट्रसह, देशात चांगल्या पद्धतीने परिणाम जाणवत आहे . त्यामुळे उपचार मिळाल्यानंतर रुग्ण या साथीच्याआजारातून बाहेर पडू शकतो हे स्पष्ट झाले आहे. शहरात मिळालेले रुग्ण हे अनेक जणांच्या संपर्कात आलेले आहेत. अशी शक्यता नाकारता येत नाही त्याच बरोबर नवीन रुग्ण येण्याची शक्यता बळावली आहे त्यामुळे मनपाने तयारी सुरू केली आहे.
महानगरपालिकेकडून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. सर्वसामान्य लोकांसाठी असलेले मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात एकमेव रुग्णालय आहे. या मध्ये अपघात विभाग , प्रसूती विभाग, बाह्यरुग्ण विभाग असे विभाग होते ते आता बंद करून या रुग्णालयात आता कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत अशी माहिती प्रशासना कडून मिळते आहे.
प्रसूतीगृह मिरारोड येथील इंदिरा गांधी रुग्णालयात सुरू राहील जर या व्यतिरिक्त गरज निर्माण झाल्यास खाजगी रुग्णालयात उपचार केले जातील त्याचे मनपाकडून दर निश्चित करण्यात येणार आहेत.
पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात एक अतिदक्षता कक्ष बनावण्यात येत आहे. रुग्णालयात उपचारासाठी व्हेंटिलेटर गरज भासणार आहे साध्य या रुग्णालयात १०० बेड उपलब्ध आहेत आणि ६ व्हेंटिलेटर आहेत.
मीरा-भाईंदर महानगर पालिकेकडे आयसीयू सुविधांचा अभाव आहे. ही सुविधा भक्तीवेदांत हॉस्पिटल कडून पुरवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच बरोबर पालिकेतील डॉक्टरांची कमतरता पाहता मनपा उपायुक्त संभाजी पाणपट्टे यांनी काही डॉक्टरांच्या संघटने बरोबर चर्चा केलीआणि काही प्रमुख डॉक्टरांची बैठक घेतली. तर शहरातील खाजगी डॉक्टरांनी पालिकेला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे.
पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेली दहा प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू आहेत तेथेही गर्दी वाढत आहे. अशा ठिकाणी पालिका वैद्यकीय अधिकाऱ्या बरोबर एक खाजगी डॉक्टर ही उपलब्ध असतील, रुग्णांच्या उपचारा बरोबरच कोरोनासदृश्य लागण वाटलेल्या रुगणना तपासणीत प्राधान्य दिले जाणार आहे.
तर या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या दैनंदिन रुग्णासाठी मिरारोड येथील इंदिरा गांधी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागणार आहे. त्या ठिकाणी दररोजच्या येणारी रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत त्यासाठी मनपा प्रशासनाकडून लवकरच मदतीसाठी हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.