धक्कादायक :- मीरा-भाईंदर शहरात कोरोनाने घेतला ५० वर्षाच्या इसमाचा पहिला बळी

धक्कादायक :- मीरा-भाईंदर शहरात कोरोनाने घेतला ५५वर्षाच्या इसमाचा पहिला बळी



 मीरा-भाईंदर मधील कोरोना विषाणूची लागण झालेली संख्या वाढली आहे आजच्या दिवसात नविन ५ रुग्ण बाधित आढळून आले आहेत त्यामुळे आता शहरातील कोरोना रुगणांची संख्या २२ इतकी झाली आहे. तर कोरोनाने मीरा भाईंदर शहरातून ५० वर्षाच्या इसमाचा पहिला बळी गेल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मिरा भाईंदरमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असून आज एकाचा मृत्यू झालाआहे त्याच बरोबर ५ नवीन रुग्ण समोर आल्याने शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या आता २२ एवढी झाली आहे. दरम्यान, मिरा रोड येथील ५० वर्षीय करोनाबाधित व्यक्तीचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. हा मिरा भाईंदर शहरातील करोनाचा पहिला बळी ठरला आहे. आज नवीन मिळून आलेल्या ५ रुग्णांमध्ये ४ पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहेत. हे रुग्ण मिरा रोड आरएनए ब्रॉडवे मधील ६२ वर्षीय पुरुष,७३ वर्षीय महिला ,भाईंदर गोडदेव येथील ३० वर्षीय पुरुष व आदर्श शाळेजवळील ३६ वर्षीय पुरुषाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कालपर्यंत १७ जणांना कोरोनाची लागण झाली होती आता वाढून शहरात २२ जणांना करोनाची लागण झाली तर  जोगेश्वरीच्या ट्रामा सेंटर रुग्णालयात उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झालाची माहिती पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी आज दिली.


मिरा भाईंदरमध्ये ५५४ नागरिकांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आहे. तसंच ४५० नागरिकांना घरातच अलगीकरण करण्यात आले आहे. रोज या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे.आतापर्यंत १२२ स्वॅब तपासण्यांमध्ये २२ रुग्ण हे पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.तर ५२ निगेटिव्ह असून ४८ जणांचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही.दरम्यान पोलिसांनी रुग्ण वास्तव्य करीत असलेल्या इमारतीकडे जाणारे रस्ते प्रतिबंधित केले असून पुढील आदेश येईपर्यंत कोणालाही घराबाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.