मढ मालाड मधील तरुणांनी बाबासाहेबांच्या जयंती निमित्त परिसरातील कुटुंबाना दिला मदतीचा हात

देशभरात कोरोना रोगाच्या विषाणूने कल्लोळ माजवला आहे. देशामधील नागरिकांमध्ये भीतीयुक्त वातावरण निर्माण झालेले आहे. महाराष्ट्रातली गंभीर परिस्थिती पाहता आणि त्यातल्या त्यात मुंबई शहराची कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या ही चिंता वाढवणारी आहे. १४ एप्रिल बाबासाहेबांचा जन्म दिवस संपुर्ण जगात मोठया थाटामाटात साजरा केला जातो पण या वर्षी जगावर आलेले कोरोना विषाणूच्या महामारीचे संकट पाहता आणि देशात सुरू असलेली संचारबंदी व लॉकडाउन मुळे यावर्षीची जयंती घरीच साजरी करण्याचे आवाहन नेते, सामाजिक मंडळी,धर्मगुरू, आणि सरकारने जनतेला विनंती केली आहे. त्यामुळे घरीच जयंती साजरी केली जाणार पण मुंबई  मढ मलाड पश्चिम येथील येथील सामाजिक कार्यकर्ते तथा व्याख्याते राहुल सुभेदार  त्यांच्या सहका-यांनी जयंती च्या निमित्ताने परिसरातील कुटुंबांना मदतीचा हात म्हणून किराणा सामानाचे वाटप केले आहे.

लॉकडाऊन लागू झाल्यापासून अनेकांचे रोजगाराचे मार्ग बंद झाले आहेत. परंतु हातांवर पोट असणाऱ्यांकडे पैसाच नसेल तर खायचे काय हा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोनाच्या संकटात डॉक्टर, पोलिस, सफाई कामगार, वीजपुरवठा कर्मचारी, शासन प्रशासन सर्वजन आपापले योगदान देत आहेत. आपण सुद्धा समाजाचे घटक आहोत , आपणही शक्य तशा प्रकारची मदत करायला हवी म्हणून " एक हात मदतीचा, नायनाट करूया कोरोनाचा " या विचाराने मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते तथा व्याख्याते राहुल सुभेदार  त्यांच्या सहका-यांसह मढ मलाड पश्चिम येथील कुटुंबांना किराणा सामानाचे वाटप करीत आहेत. यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सार्वजनिकरित्या साजरी करता येणार नाही. परंतु  त्यांच्या विचारांना प्रमाण मानून अनेक गरजू कुटुंबांना शक्य तेवढी मदत करूया आणि एक वेगळी भीमजयंती साजरी करूया असे आवाहन राहुल सुभेदार यांनी केले आहे. या कार्यासाठी राजेश गवई, मंगेश जोगतळे इत्यादी सहकार्य करीत आहेत.

"मानव सेवा हीच ईश्वर सेवा" हे वाक्य आपण नेहमी ऐकत असतो पण तो प्रत्यक्ष कृतीत मात्र उतरवण्याचा प्रमाणिक पणे प्रयत्न करत नाही.

सध्याच्या संकटमय काळात प्रत्येकजण आपला जीव मुठीत धरून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी घरात बसून आहे पण ज्याच्या अंगी सेवा वृत्ती असते आणि ज्यांना,मानवता धर्म जपून मानव सेवावृत्ती करण्याची ईच्छा ते मात्र कोणत्याही परिस्थितीवर मात करत सर्वसामान्याच्या मदतीला धावून आलेले पाहिला मिळाले आहे असेच काही तरुण एकत्र येऊन या महामारीच्या संकट काळात परिसरातील जनतेला मदतीचा हात देण्यासाठी पुढे आलेले पाहहायला  मिळाले तर अशी ही आगळीवेगळी जयंती साजरी करण्यात येत आहे.

देशभरात कोरोना रोगाच्या विषाणूने कल्लोळ माजवला आहे. देशामधील नागरिकांमध्ये भीतीयुक्त वातावरण निर्माण झालेले आहे. महाराष्ट्रातली गंभीर परिस्थिती पाहता आणि त्यातल्या त्यात मुंबई शहराची कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या ही चिंता वाढवणारी आहे. १४ एप्रिल बाबासाहेबांचा जन्म दिवस संपुर्ण जगात मोठया थाटामाटात साजरा केला जातो पण या वर्षी जगावर आलेले कोरोना विषाणूच्या महामारीचे संकट पाहता आणि देशात सुरू असलेली संचारबंदी व लॉकडाउन मुळे यावर्षीची जयंती घरीच साजरी करण्याचे आवाहन नेते, सामाजिक मंडळी,धर्मगुरू, आणि सरकारने जनतेला विनंती केली आहे. त्यामुळे घरीच जयंती साजरी केली जाणार पण मुंबई  मढ मलाड पश्चिम येथील येथील सामाजिक कार्यकर्ते तथा व्याख्याते राहुल सुभेदार  त्यांच्या सहका-यांनी जयंती च्या निमित्ताने परिसरातील कुटुंबांना मदतीचा हात म्हणून किराणा सामानाचे वाटप केले आहे.

लॉकडाऊन लागू झाल्यापासून अनेकांचे रोजगाराचे मार्ग बंद झाले आहेत. परंतु हातांवर पोट असणाऱ्यांकडे पैसाच नसेल तर खायचे काय हा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोनाच्या संकटात डॉक्टर, पोलिस, सफाई कामगार, वीजपुरवठा कर्मचारी, शासन प्रशासन सर्वजन आपापले योगदान देत आहेत. आपण सुद्धा समाजाचे घटक आहोत , आपणही शक्य तशा प्रकारची मदत करायला हवी म्हणून " एक हात मदतीचा, नायनाट करूया कोरोनाचा " या विचाराने मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते तथा व्याख्याते राहुल सुभेदार  त्यांच्या सहका-यांसह मढ मलाड पश्चिम येथील कुटुंबांना किराणा सामानाचे वाटप करीत आहेत. यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सार्वजनिकरित्या साजरी करता येणार नाही. परंतु  त्यांच्या विचारांना प्रमाण मानून अनेक गरजू कुटुंबांना शक्य तेवढी मदत करूया आणि एक वेगळी भीमजयंती साजरी करूया असे आवाहन राहुल सुभेदार यांनी केले आहे. या कार्यासाठी राजेश गवई, मंगेश जोगतळे इत्यादी सहकार्य करीत आहेत.

"मानव सेवा हीच ईश्वर सेवा" हे वाक्य आपण नेहमी ऐकत असतो पण तो प्रत्यक्ष कृतीत मात्र उतरवण्याचा प्रमाणिक पणे प्रयत्न करत नाही.

सध्याच्या संकटमय काळात प्रत्येकजण आपला जीव मुठीत धरून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी घरात बसून आहे पण ज्याच्या अंगी सेवा वृत्ती असते आणि ज्यांना,मानवता धर्म जपून मानव सेवावृत्ती करण्याची ईच्छा ठेवतात ते मात्र कोणत्याही परिस्थितीवर मात करत सर्वसामान्याच्या मदतीला धावून आलेले पाहिला मिळातात असेच काही तरुण एकत्र येऊन या महामारीच्या संकट काळात परिसरातील जनतेला मदतीचा हात देण्यासाठी पुढे आलेले पाहायला  मिळाले.त्यांच्याकडून अशी ही आगळीवेगळी बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात येत आहे.