जगी तू फक्त भिमराया (जयंती विशेष) कविता कवींच्या शब्दात

जगी तू फक्त भिमराया


नभाचा चंद्र तू बाबा तुझी शीतल असे छाया
स्वत:भोगून दुःखाला दिली आम्हास तू माया


तुझ्या छायेत जगताना नसे आम्हास भीतीही
तुझ्या त्या संविधानाने अशी केली जगी किमया


किती झाले किती गेले किती आले जगी नेते
दिनाचा एक दाता तू जगी तू फक्त भिमराया


तुझ्या त्यागामुळे आली घरी ताटात ही भाकर
दिले संस्कार जगण्याचे उजळली ही किती काया


भरारी जीवनाची ही अशी घेतो अता आम्ही
तुझा आदर्श घेऊनी अता शिकलोय चालाया


नसे वाचा मुके होते कधीही बोललो नव्हतो
दिले तू ज्ञान विद्येचे शिकवले तूच बोलाया


करारी कायदा होता तुझा बाणा करारी तो
तळपती लेखणी हाती सुगंधी शस्त्र ती फाया


रजनी निकाळजे
(शब्द रजनी)
मानसी क्लासिक ११०४बी विंग ,
साईकृपा कॉम्प्लेक्स जवळ ,
काशीमीरा , मीरा रोड पूर्व , जिल्हा ठाणे (मुंबई)
मो.नं. ८३०८६९१३२१