मीरा भाईंदर मध्ये सोशल डिस्टसिंगचा फज्जा
मीरारोड पूर्व :
करोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार पूर्ण महाराष्ट्रात जमावबंदी व सांचारबंदी लागू करण्यात आले .सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त नागरिकांना गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे तरीही बेजबाबदार नागरिक शासनाचे आदेश धुडकावून बाजारामध्ये फिरत आहेत.विणाकारण घरा बाहेर पडणाऱ्या लोकांना बघून यांच्यावर पोलिसांची भीति उरलेली नसल्याने त्यांच्या कडून संचारबंदीचे उल्लंघन केले जात आहे.
भाईंदर मधील केबिन रोड ,रावल नगर , नर्मदा नगर परिसरात रविवारी सकाळी ९ च्या सुमारास नागरिक घरा बाहेर पडल्याने रस्त्यावर गर्दी पहायला मिळाली .या प्रकरणाकडे पालिका व पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने जागरूक नागरीकांनी रोष व्यक्त केला आहे .सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त नागरिकांना गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे तरीही बेजबाबदार नागरिक शासनाचे आदेश धुडकावून बाजारामध्ये फिरत आहेत .सकाळच्या सुमारास शेकडो नागरिक वस्तू खरेदी करण्यासाठी घराबाहेर येत असल्याने गर्दी जमा होऊन कोरोना विषाणूंचा फैलाव होण्याची भीती निर्माण झाली आहे .
भाजीपाला , किराणा, औषध आदी वस्तू जीवनावश्यक वस्तू आसल्याने नागरिकांना खरेदी करणे आवश्यक आहे मात्र खरेदी करताना सोशल डिस्टसिंग ठेवणे तेवढेच गरजेचे आहे .मिरा भाईंदर मध्ये दिवसेंदिवस करोना बधितांची संख्या वाढत असताना बेजबाबदार नागरिक जीवाची पर्वा न करता घराबाहेर पडत आहेत .संबधित पोलीस प्रशासन विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे .नागरिकांना पोलीस प्रशासनाचा वचक नसल्याने कामा व्यतिरिक्त घराबाहेर पडत आहेत .गर्दी झालेल्या ठिकाणी पोलिस उपस्तित नसल्या मुळे अशे प्रकार घडत आहेत.