दारूचा काळा बाजार आता थांबणार, दारूची दुकाने होणार खुली 

दारूचा काळा बाजार आता थांबणार, दारूची दुकाने होणार खुली



दारूची तलफ कशी भागवायची याच चिंतेत अनेकजण दिवस रात्र असायचे  अचानक पने देशात सुरू झालेला लॉकडाऊन तळीरामना टेंशन देऊन गेला होता. दारूची आलेली तलफ पुरी करण्यासाठी मोजावी लागणारी रक्कम ही खिशालाही परवडणारी नव्हती तीन ते चार पटीने काही संधीसाधू लोक चोरीछुप्या मार्गाने दारू विकत होते. या संधीसाधू लोकांच्या या धंद्यांना मात्र आता चाप बसणार आहे.


करोना विषाणू रोखण्यासाठी सरकारने कडक पावले उचलत संपूर्ण देश लॉकडाउन करत गेल्या चाळीस दिवसापासून सगळीकडे बंदी घातली होती. या अचानकपणे घातलेल्या बंदीने तळीरामांचे हाल उठले होते. या काळात तळीरामांची बैचैनी वाढली होती अनेक महाभागांनी समाज माध्यमातून सरकार कडे विनंती करणारे व्हिडीओ शेअर केले. देशात सुरू असलेल्या या संकटमय परिस्थितीत उपाययोजना म्हणून कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात आली  होती पण आतापर्यंतच्या नियमांमध्ये आता थोडी-थोडी शिथीलता सरकार कडून देण्यात येत आहे. सरकारकारकडून   ग्रीन झोनआणि ऑरेंज झोन असलेल्या काहीसा जिल्ह्यांना दिलासा दिला होता. तेथील काही दुकाने सुरू करण्याची परवानगी महाराष्ट्र सरकारने दिली आहे. त्या विभागात दारू विक्री ची दुकाने सुरू करण्यात येणार होते पण आता रेड झोनमध्ये राहणाऱ्यांनाही सराकरनं दिलासा दिल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं टि्वटरच्या माध्यमातून ट्विट करून जाहीर केले आहे.


एएनआयनं ने दिलेल्या बातमी नुसार, महाराष्ट्र मध्ये  आता रेडझोनमध्येही दारूविक्री चे दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण, रेड झोनमध्ये असलेल्या असंवेदनशील क्षेत्रांत असलेली दुकाने सध्या उघडता येणार नाहीत.अशी माहिती मिळते आहे. 
या दुकानांची वेळ ही स्थानिक पातळीवर असलेले प्रशासन परिस्थिती चा आढावा घेऊन ठरवणार आहे.या परवानगी नुसार अद्याप कोणतेही बार किंवा रेस्टॉरंट खुले केले जाणार नाही त्याचबरोबर सोशल डिस्टनसिंग पाळून हि दुकाने सुरू राहतील मॉल किंवा फूड प्लझा मधील कोणतेही दुकान सुरू होणार नाहीत एका वेळी एकच व्यक्ती दुकानात दारू खरेदी करण्यासाठी उभा ठेवण्यात येईल अशी काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले जात आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय कितपत योग्य पद्धतीने चालेल हे पाहण्यासाठी काही काळ वाट पहावी लागणार आहे