तलफ भागवण्यासाठी मीरा-भाईंदर मधील तळीरामा चा मोर्चा दहिसर च्या दुकानाकडे
सरकारने तळीरामांची प्रतिक्षा आणि वाढत चाललेली मागणी लक्षात घेऊन दारूची दुकाने सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. देशात आणि राज्यात सुरू असलेला लॉकडाउन, कोरोनाचा वाढता हैदोस दररोज वाढत असलेले रुग्ण पाहता स्थानिक प्रशासनाला परस्थिती पाहून निर्णय घेण्याचे दुकाने सुरू किंवा बंद ठेवण्याचे अधिकार देण्यात आले.विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मिरा-भाईंदर महानगरपालिकेने शहरात ८ मे पर्यंत शहर पूर्णतः लॉक डाऊन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. . यामुळे सरकारने दारू दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला तरीही मीरा-भाईंदर शहरातील दारूची सर्व दुकाने बंद आहेत त्यामुळे शहरातील तळीरामांचा मात्र भ्रमनिरास झाला आहे.
पण तळीराम शांत राहतील ते तळीराम कसले मग त्यांनी आपला मोर्चा जवळच्या मुंबई कडे वळवला. एकीकडे कोरोनाचा वाढता संसर्ग जीवाची कुटुंबाची पर्वा न करताही आपली तलफ भागवण्यासाठी तळीराम मात्र उन्हातानात रांगा लावून सलग दुसऱ्या दिवशी देखील मद्यविक्री दुकानाबाहेर तळीरामानी एकच गर्दी केली होती.
दहिसर परिसरात बऱ्याच ठिकाणी दारूच्या दुकानाबाहेर भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. मीरा-भाईंदर साठी दहिसर जवळ असल्यामुळे दहिसर चेकनाका व आजूबाजूच्या परिसरात मीरा-भाईंदर मधले तळीराम तुटून पडलेले दिसून आले त्यामुळे या परिसरात अनेक दुकानात गर्दी झालेली पाहायला मिळाली पोलिसांना त्या ठिकाणी जावे लागले तर दहिसर चेक नाका येथील राज वाईन शॉप येथे लागलेल्या रांगा थेट दहिसर टोल नाक्यापुढे गेल्या होत्या.दुसरीकडे याच वाईन शॉपवर महिलांसाठी वेगळी रांग लावण्यात आली होती. त्यात महिलांची उपस्थिती देखील लक्षणीय होती.मिरा-भाईंदर शहरात कडक लॉकडाऊन असल्याने तेथील सर्व दुकाने पूर्णतः बंद आहेत.त्यामुळे तळीरामानी आपला मोर्चा आता दहिसर चेकनाक्यावर वळविला आहे.कुठूनही आपला कोरडा घसा ओला करुन तलफ भागवण्यासाठी तळीरामांनी सकाळपासून मोठी गर्दी केली होती. तर आनंद नगर येथील दारू विक्री दुकाना बाहेर ही परिस्थिती वेगळी नव्हती. राज्य सरकारने लॉकडाऊनचा तिसरा टप्पा हा दोन आठवड्याचा वाढवल्याने अनेक तळीरामांच्या तोंडचे पाणी पळाले होते पण सरकारने काही प्रमाणात या टप्प्यात शिथिलता दिल्यामुळे तळीरामांना दिलासा मिळाला तर दारूची चोरी छुप्या मार्गाने होणारा काळाबाजार थांबला आहे या दारू विक्री दुकानात ग्राहकांना दारू खरेदी करण्यापूर्वी प्रत्येकाचे हात सॅनिटायझरने धुण्याची दक्षता प्रत्येक दुकानदाराने घेतलेली दिसून आली.