मीरा-भाईंदर शहरात कोरोना रुग्णांचा आकडा झाला दोनशे पार
मीरा-भाईंदर शहरामध्ये कोरोनाचा रुग्ण एप्रिलमध्ये पहिल्या आठवड्यात मिळून आला तर में महिन्याचा पहिला आठवड्यात रुग्णांचा आकडा दोनसे पार होऊन हा आज २०२ वर पोहचला आहे. गुरुवारी पाच नवीन तर एकरुग्ण संपर्कातील रुग्ण आढळून आला आहे.
मीरा-भाईंदर शहरातील वाढत चालले रुग्णांची संख्या ही शहरवासीयांसाठी चिंता वाढवणारी बाब आहे. शहरात १००% लॉकडाउन ठेऊन ही रुग्ण वाढीत फरक पडलेला दिसत नाही. शहरात सोशल डिस्टन्स चे तीन तेरा वाजले जात आहेत. काही नागरिकांत या बाबीचे गांभीर्य दिसून येत नाही उनाडगिरी करत फिरनाऱ्यांची संख्या जास्त आहे. जे आज ही शहरातील नागरिकांना त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. शहराने कोरोना ग्रस्तांचा आकडा दोनसे पार केलाआहे. सध्या शहरात कोरोनाची लागण झालेले एकूण रुग्ण २०२ पोहचले आहेत तर ९४ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. शहरातील आजची कार्यरत कोरोनाची संख्या ६८ झालेली आहे, तर ७ कोरोना ग्रस्त रुग्णांचा मृत्य झाला आहे. आज दिवसभरात २ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर शहरात बरे होऊन घरी जाणाऱ्यांची एकूण संख्या १२७ आहे.
आज मिळून आलेल्या नवीन रुग्णामध्ये ५ पुरुष व १ महिलेचा समावेश आहे. यात भाईंदर पूर्व येथील न्यू गोल्डन नेस्ट फेस ८ येथील ५६ वर्षीय पुरुष, ओल्ड गोल्डन नेस्ट येथील ५२ वर्षीय पुरुष, तर भाईंदर पश्चिमेच्या नागेश्वर नगर, ६० फुटी रोड जवळील ७८ वर्षीय पुरुष रुग्ण आहेत. दुसरीकडे मिरारोड मधील गंगा कॉम्प्लेक्स, लोढा रोड येथील ३३ वर्षीय पुरुष, जागींड इन्कलेव्ह, कणकीया रोड येथील २६ वर्षीय युवकाला लागण झालेली आहे. तर गोल्डन नेस्ट ३, मिरा भाईंदर रोड येथील ६५ वर्षीय महिला रुग्णांचा समावेश आहे. यात १ रुग्ण हा कोरोना पेशंटच्या संपर्कात आल्याने बाधित झालेला आहे तर ५ जण हे नव्याने शहरात आढळून आले आहेत.
महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत कोरोना साठी पडताळणी केलेल्या नागरिकांची एकुण संख्या १८५२ आहे. यापैकी ६० जण नव्याने आढळुन आलेले आहेत. तर आता पर्यंत १३०० जणांची स्वब (SWAB TEST) टेस्ट घेण्यात आलेली आहे. सध्या शहरात गावी जाण्यासाठी निघणारे जथ्थे च्या जथ्थे दिवस रात्र फिरत असताना दिसत त्यामुळे भविष्यात वाढणारे धोकादायक चित्र या वर्तना मुळे वाढू शकते ही शंका नागरिकांत उपस्थित केली जात आहे.