गांवी निघालेल्या १६ कामगारांवर काळाचा घाला, निद्रेत असतांना मालगाडीने  चिरडले

 गांवी निघालेल्या १६ कामगारांवर काळाचा घाला, निद्रेत असतांना मालगाडीने  चिरडले गांवी निघालेल्या १६ कामगारांवर काळाचा घाला, निद्रेत असतांना मालगाडीने  चिरडले


कोरोनाच्या संकटाला हरवण्यासाठी देशात लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे हाताला काम नाही हातात दाम नाही खायला अन्न नाही अशा हाताबल करणाऱ्या परस्थिती गावी परतणाऱ्या परप्रांतीय मजुरांवर काळाने घाला घातला औरंगाबाद-जालना मार्गावरील रेल्वे रुळावर २१ जणांना मालगाडीने उडवले तर त्यातील १६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.


 औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वात दुर्दैवी घटना घडली आहे बदनापूर  आणि करमाड  दरम्यान हा अपघात घडला आहे. लॉकडाउन च्या काळातली ही दुर्दैवी घटना आहे. अचानक घडलेल्या घटनेने सगळ्यांचे डोळे पाणावले आहेत. 


देशात वाढत असलेला लॉक डाउन यामुळे अनेक कंपन्या कारखाने बंद असल्यामुळे कामगारांच्या हाताला काम मिळणे बंद झाले. त्यातच कोरोना महामारीच्या साथीची भीती वाढलेली असतानाच वाढलेला लॉक डाऊन दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे हे कामगार चिंतेत होते.त्यामुळे त्यांनी गांवी जाण्याचा निर्णय घेतला हे सगळे कामगार जालना येथे एका खाजगी कंपनीमध्ये काम करत होते. सगळे कामगार मध्यप्रदेशातील दोन जिल्ह्यामधील असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना कुठून तरी माहिती मिळाली होती की, गावी जाण्यासाठी भुसावळ रेल्वे स्थानकातून रेल्वे मिळेल अशी माहिती त्यांना मिळाली होती त्यामुळे ते भुसावळ च्या दिशेने चालत निघाले होते पोलिसांची नजर चुकवून पोलिसांचा ससेमिऱ्याला  घाबरून त्यांनी रेल्वे रूळावरून  जाण्याचा मार्ग पत्करला काही काळ चालल्यानंतर  रात्र झाल्यामुळे  थकवा जाणवू लागल्याने  थोडा आराम करण्या साठी  ते थांबले सटाणा शिवरा जवळ रेल्वे रुळावर आराम करण्यासाठी झोपी गेले असे वाटले होते की, रेल्वे सध्या बंद आहेत त्यामुळे कोणतीही रेल्वे येणार नाही या भ्रमात रेल्वे रुळावर झोपी गेले तिथेच काळाने त्यांचा घात केला आणि भर निद्रेत असताना पहाटेच्या सुमारास जालना कडून औरंगाबाद कडे येणाऱ्या  मालवाहू  रेल्वेचा त्यांना अंदाज आला नाही,या मालगाडीने क्षणात होत्याचे नव्हते केले. या मालागडीने १६ जणांना  जागीच ठार केले ते चार जण गंभीर जखमी झाले आहेत.  गंभीर जखमीनां जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. त्याची माहिती मिळतात  स्थानिक पोलिस अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली  घटनेचा पंचनामा ही  केला असून जखमींना उपचारासाठी  रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात व महाराष्ट्रात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांनी ट्विट करून घडलेल्या घटने बद्दल दुःख व्यक्त केले आहे. तर पियुष गोयल केंद्रीय रेल्वेमंत्री  यांनीही आपल्या आपल्या भावना  व्यक्त केल्या आहेत या घटनेचा तपास पोलिस करत आहेत.