मीरा-भाईंदर मधील कोरोना ग्रस्तनांची संख्या गेली 400 पार
मीरा भाईंदरमध्ये कोरोना ग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. रुग्णांची वाढती संख्या कमी होताना दिसत नाही गेल्या दोन महिन्यापासून शहरात सुरु असलेला लॉक डाऊन पाहता नागरिकांच्या अडचणीत मोठी वाढ झालेली दिसत आहे हाताला काम नसल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे कठीण झाले आहे
जगाला वेटीस धरलेल्या कोरोनाच्या महामारी ने घातलेले थैमान थांबवण्यात सरकार जरी प्रयत्नशील असले तरीही या महामारीला रोखणे कठीण बनले आहे. मिरा-भाईंदर शहरात सध्या कोरोना ग्रस्ता रुग्णांची संख्या 403 वर पोहोचली आहे तर मृत्यूचा आकडा 12 वर जाऊन पोचला आहे उपचारा घेऊन बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे यामध्ये आतापर्यंत 252 रुग्ण उपचार घेऊन बरे झालेले आहेत. शहरात सध्या नवीन रुग्ण मिळण्याचा प्रमाणात मोठ्या झपाट्याने वाढ होत आहे दररोज मिळणाऱ्या नवीन रुग्णांच्या आकडा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे भविष्यातला काळ भयावह ठरतो की काय अशी चिंता जागरुक नागरिकांनी व्यक्त केली आहे. कोरोना चा हा कहर थांबवणे अशक्य नाही यासाठी प्रत्येक नागरिकांनी जागरूक होऊन शासनाच्या नियमावलीचे पालन करणे जेवढे गरजेचे आहे कायद्यांचे पालन तेवढे होणे आवश्यक आहे पण तसे होताना दिसत नसल्यामुळेच हा आकडा मोठ्या प्रमाणात वेग पकडतो आहे.
अत्यावश्यक सेवा देणार कर्मचारीवर्ग कोरोनाच्या विळख्यात मोठ्या प्रमाणात सापडताना दिसून येत आहे. आणि त्यांच्या सहवासात येणारा नागरिक यालाही कोरोनाचा विळखा पडतो आहे म्हणून अत्यावश्यक सेवा देताना घ्यावयाची काळजी ही पुरेपूर पणे न घेतल्यामुळे कोरोना ग्रस्तांच्या वाढीचा हा वेग सातत्याने वाढताना दिसत आहे. सध्याचे भयावह चित्र पाहता सर्वांनी जागरूक होऊन या संकटाचा मुकाबला करणे जेवढे गरजेचे आहे. तेवढेच लवकर या महामारी तून आपण मुक्त होऊ अशी अपेक्षा अनेक जागरूक नागरिकांना वाटते आहे