मीरा-भाईंदर मध्ये अडकलेले ६० कामगार खाजगी प्रवासी बस ने राजस्थानला रवाना

मीरा-भाईंदर मध्ये अडकलेले ६० कामगार खाजगी प्रवासी बस ने राजस्थानला रवाना


कोरोना साथीमुळे गेल्या दिडमहिन्यापासून देशात सुरू असलेला लॉकडाउन यात अडकून पडलेले मजूर, कामगार , प्रवासी, विध्यार्थी, पर्यटक यांची कोंडी झाली होती त्यांना त्यांच्या मूळगावी जाण्याचा मार्ग सरकारने मोकळा केल्यामुळे भाईंदर- मिरा भाईंदर मध्ये अडकलेले राजस्थान मधले कामगार दोन प्रवाशी बस भरून ६ एप्रिल रोजी संध्याकाळी भाईंदरच्या गोल्डन नेस्ट येथून राजस्थानला पाठवण्यात आले.



 मीरा-भाईंदर शहरात कामानिमित्त राजस्थान राज्यातून  तालुका भिनमाल जिल्हा जालोर येथून आलेले कामगार लॉकडाउन मुळें शहरात अडकले होते.त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी खाजगी प्रवासी दोन बस द्वारे व्यवस्था करण्यात आली असून या दोन्हीही  प्रवाशी बसमध्ये एकूण ६० जणांना घेऊन जाण्यात आले आहे.
आमदार गीता जैन यांच्या प्रयत्नाने दोन बस सोडण्यात आल्या आहेत. या कामगारांना त्यांच्या मूळगावी पाठवण्यासाठी आमदार गीता जैन यांनी रीतसर परवानगी मिळवून देऊन त्याना सहकार्य केले. या मध्ये गावी जाणाऱ्या सर्व कामगारांची आरोग्य तपासणी केली. शासकीय नियम व सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घेतली गेली.


 मिरा भाईंदर मनपा परिसरात हजारो कामगार अडकून पडले आहेत. ते ही आपल्या मूळगावी जाण्यासाठी धावपळ करत आहेत. शासनाने गावी जाण्यासाठी परवानगी दिल्यामुळे त्यांना एकदाचे आप-आपल्या मूळगावी कधी जातायेईल असे झाले आहे.
 मिरा भाईंदर मधून अडकलेल्या प्रवाश्यांना सोडण्यासाठी भाईंदरच्या गोल्डन नेस्ट येथून निघालेल्या दोन प्रवाशी बस कुठेही न थांबवता सरळ
राजस्थान राज्यातील जालोरला जिल्हा येथे पोहोचणार आहे. या सर्व कामगारांच्या जेवणाची व पाण्याची व्यवस्था आमदार गीता जैन यांच्या वतीने करण्यात आली. तर लहान मुलांना ग्लुकोज बिस्कीट देण्यात आले. पोलीस व महसूल प्रशासनाच्या सहकार्याने आज विशेष दोन बस रवाना करण्यात आल्यात. शहरात मध्ये अडकलेले राजस्थानचे कामगार व प्रवाशी आपल्या गावी रवाना झाले आहेत. गावी जाते वेळी कामगारांच्या चेहऱ्यावरची चिंता कमी झालेली दिसून येत होती.