कोरोना ग्रस्त रुग्णाचा चक्क दोन तास रस्त्यावर धिंगाणाकोरोना ग्रस्त रुग्णाचा चक्क दोन तास रस्त्यावर धिंगाणा
देशात पसरलेली कोरोना महामारीची भीती आणि वाढत चाललेली रुग्णांची संख्या या मुळे संपूर्ण मीरा-भाईंदर शहर चिंतेत असतांना मिरारोड पूर्व भागातील कनकीया परिसरातील बेव्हली पार्क मधील एक रुग्णाने चक्क रस्त्यावर दोन तास धिंगाणा घातल्यामुळे वैद्यकीय विभागाचेअधिकारी पोलिस प्रशासनाची व स्थानिक नागरिकांची भांबेरी उडालेली दिसली आहे.
मीरा भाईंदरमध्ये कोरोना ग्रस्त रुग्णांचा दोन तास रस्त्यावर धिंगाणा घातला आहे. मिरारोड पूर्व परिसरातील बेव्हली पार्क मधील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे त्याचा वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असता मनपाचे वैद्यकीय विभागाचे अधिकारी या रुग्णाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठी रुग्णवाहिका घेऊन तो व्यक्ती राहात असलेल्या घरी गेले असता हा कोरोना ग्रस्त रुग्ण रुग्णालयात यायला तयार होत नव्हता इमारतीच्या आवारात त्याने तमाशा केला. मला हॉस्पिटलमध्ये यायचंच नाही मला या ठिकाणी राहू द्या मी येणार नाही असा बोलत होता तर डॉक्टर त्याची समजूत घालत होते पण हा काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता उलट तो वैद्यकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत होता हा धिंगाणा त्याने जवळपास दोन तास सुरू ठेवला होता. सोसायटीच्या सदस्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते पण त्याचा काही उपयोग झाला नाही उलट त्यावेळी त्याने सोसायटीमधील अनेक लोकांना हातही लावला. मी एकटा जाणार नाही तुम्हा सगळ्यांना घेऊन जाणार असे बोलत होता. आरोग्य विभागाचे अधिकारी समजावून सांगत होते पण त्याचा धिंगाणा सुरूच राहिल्यामुळे अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले तरीही हा इसम कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता पोलिसांनी समजावले तरीही त्याचा तमाशा सुरूच होता अखेर पोलिस आल्यावर अर्ध्या तासानंतर तो रुग्णवाहिकेत बसला तेव्हा त्याला वैद्यकीय अधिकारी घेऊन गेले आणि पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले. मराठीमधील अनेक लोकांना हातही लावला तुम्हालाही करणार असा हा पॉझिटिव्ह रुग्ण बोलत होता आरोग्य विभागाचे अधिकारी आणि त्यांच्या पथकाला शिवीगाळ सुद्धा केले पोलिस घटनास्थळी दाखल होता त्यानंतर अर्ध्या तासानंतर मध्ये बसला तर मला पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु अशा प्रकारामुळे शहरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या कशी कमी होणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. असे बेजबाबदारीचे वर्तन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी स्थानिक नागरिक करतांना दिसून येत होते. तेव्हा असे प्रकार प्रशासनाणे गंभीरपणे घेणे गरजेचे आहे.