५ ते ८ मे पर्यंत झेरॉक्स, स्टेशनरी, पुस्तकांची दुकाने सुरू
मीरा भाईंदर शहरातला वाढता लॉकडाऊन आणि वाढती रुग्णांची संख्या दिवसंदिवस वाढत असल्यामुळे शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे, दीड महिन्यापासून घरात बसलेला व्यक्ती भिती व चिंतेत जगत आहे. या वास्तवातल्या जगण्यात कटांळलेल्या नागरिकांना मिरा-भाईंदर मनपा आयुक्त यांनी थोडा दिलासा दिला आहे.
या लॉकडाउन च्या काळात वेगवेगळ्या राज्याचे , जिल्ह्याचे नागरिक अनेक ठिकाणी अडकून पडलेले प्रवासी, कामगार,त्यांच्या मूळ गांवी पाठवण्याची तयारी सरकार करत आहे. रेल्वे खाजगी,सरकारी बस द्वारे त्यांना त्यांच्या मूळगावी नेऊन सोडण्यासाठी सरकारने नियोजन केले आहे तर शाळेतील मुलांना पुढील वर्षात प्रवेश मिळणार आहे त्यामुळे त्यांना अभ्यासासाठी लागणारे साहित्य मिळावे या करिता सरकारच्या वतीने स्टेशनरी, पुस्तकांचे दुकान झेरॉक्स आदी दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मानपा क्षेत्रात कामानिमित्त आलेल्या व लॉकडाउन मुळे अडकून पडलेल्या लोकांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी सरकारने सेवा सुरू केली आहे अडकून पडलेल्या नागरिकांनी सरकारने दिलेल्या माहितीनुसार ऑनलाईन व ऑफलाईन फॉर्म भरणे त्याच बरोबर डॉक्टर कडून आरोग्य तपासणी करून फॉर्म भरण्याची प्रकिर्या सुरू केली आहे. जिल्हा अधिकारी यांच्या देखरेखीखाली ही प्रकिर्या पार पाडण्यात येत आहे. ऑनलाइन फॉर्म भरण्यात सर्व्हर डाऊन होत असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे त्याच बरोबर झेरॉक्स काढण्याची सुविधांचा अभाव निर्माण झाला होता तो ही त्रास ऑफलाइन फॉर्म भरण्याने सुरू आहे, त्यामुळे झेरॉक्स काढण्यासाठी व कागदपत्रे झेरॉक्स करण्यासाठी झेरॉक्सची दुकाने उघडणे आवश्यक होते.
मीरा-भाईंदर मानपाचे आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी आज आदेश काढत ५ मे ते ८ मे २०२० पर्यंत स्टेशनरीची, शालेय पुस्तकाची आणि झेरॉक्सची दुकाने खुली ठेवण्यास सूट दिली आहे.