दोनशे रुपये खर्ची न दिल्याच्या रागाने कामगाराने केला सुपरवायझर चा खून
काशीमीरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ठाकूर मॉल च्या जवळ असलेल्या सिंगापूर इंटरनॅशनल शाळेच्या येथे शाळेचा बगीचा देखरेख करणारे कामगार यांच्यात दोनशे रुपये खर्ची वरून वादावाद झाल्याने रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत झोपितच असलेल्या सुपरवायझर चा डोक्यात लोखंडी हातोडा मारून कामगारांने खून केला आहे.
मीरा-भाईंदर मनपा हद्दीत मिररोड पूर्व मध्ये काशिमीरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहिसर चेकनाका , ठाकूर मॉल च्या जवळ असलेल्या सिंगापूर इंटरनॅशनल शाळेच्या येथे बगीच्याची देखभालीसाठी काही कामगार शाळेच्या आवारात कामगारांना राहण्यासाठी बनवलेल्या रूम राहत आहेत. त्या ठिकाणी हे कामगार राहात आहेत.सध्या लॉकडाउन मुळे सगळ्या शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे शाळा बंद आहेत. पण शाळेच्या आवारात असलेली झाडे बगीचा याची देखभाल साफसफाई साठी काही कामगार त्या ठिकाणी या शाळेच्या आवारात बनवलेल्या रूम मध्ये राहत आहेत या मध्ये एक सुपरवायजर आणि बाकी कामगार काम करत असतात त्यांना खर्ची देण्यात येत असे पण काही कारणामुळे खर्ची न मिळाल्यामुळे सुपरवायजर असलेला देवा उर्फ देवीलाल हरिनाम कालागुमान वय वर्षे २५ हा मूळचा राहणार राजसमंद राजस्थान राज्यातला आहे तर त्याच ठिकानी कामगार म्हणून काम करत असलेला लक्ष्मण दिता काकण वय वर्षे ५८ मूळ गाव जिल्हा उदयपूर राजस्थान चा असलेल्या कामगार या दोघात आठवड्याची २०० खर्ची दिली नाही म्हणून ३ में च्या सायंकाळी वादविवाद झाला. त्या रात्री नेहमीप्रमाणे सगळे कामगार जेवण करून आपापल्या जागी झोपी गेले सगळे रूम मध्ये झोपायचे पण देवीलाल आणि लक्ष्मण हे मैदानात झोपत असत सायंकाळी झालेल्या भांडणाचा राग लक्ष्मण याला आला होता तोच राग मनात ठेवत झोपेत असलेल्या सुपरवायजर देवीलाल यांच्या डोक्यात लोखंडी हातोड्याने मारून त्याला जागीच ठार केले. घटनेची माहिती ४ में ला सकाळी ७ वाजताच्या दरम्यान कामगार सकाळी उठल्यावर त्यांना झालेला प्रकार लक्षात आला तेंव्हा या ठिकाणी राहात असलेल्यानी या घटनेची खबर स्थानिक पोलिस ठाण्यात देण्यात आली तेंव्हा स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहचले आणि वरिष्ठांना घडलेल्या घटनेची माहिती दिली गेली तेंव्हा या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता या घटनास्थळी मिरारोड विभागाचे पोलिस उपअधीक्षक शांताराम वळवी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय हजारे हेही घटनास्थळी हजर झाले. स.पो.नि. गणेश भामरे, स.पो.नि. महेंद्र भामरे, पो. उपनिरीक्षक आनंद भगत यांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील कायदेशीर कारवाई केली.काशीमीरा पोलिस ठाण्यात T ३६३/२०२० भा. द. वि. स. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.