गावाकडे पोहचवण्याच्या नावाखाली मजुरांकडून पैसे उखळणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केला गजाआड
देशासह सगळ्या राज्यांमध्ये कोरोनाचे थैमान एकीकडे सुरू आहे. तर ४० ते ४५ दिवसापासून हाताला काम नसलेल्या कामगारांना पोटाला पुरेसे अन्न मिळत नसल्यामुळे आपल्या मूळगावी कुटुंबाकडे जाण्याची ओढ लागली आहे. अशातच सरकारने अडकलेल्यांसाठी गावी जाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला या निर्णयाचा फायदा समाजातील काहीअसामाजिक तत्वे उचलू पाहत आहेत अशातच मीरा-भाईंदर मध्ये एका संस्थेच्या माध्यमातून मजबुरीत अडकलेल्या कामगारांना गावी पाठवण्याच्या नावाखाली पैसे उखळण्याचा गोरखधंदा मीरा-भाईंदर कामगार वेल्फेअर संस्था अध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांनी चालवला होता याची पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखत आरोपीला तात्काळ गजाआड केले आहे.
कोरोना विषाणूचा वाढणारा धोका लक्षात घेऊन सरकारने संपूर्ण देशात संचारबंदीसह लॉकडाऊन घोषित केले त्याचे दोन टप्पे पूर्ण होत आले आहेत, तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वीच सरकारने वेगवेगळ्या कारणामुळे अनेक ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्याची तयारी सुरू केली आहे. या संधीचा काही सामाजिक संस्था नागरिकांकडून गैरफायदा घेत मजबुरी अडकलेल्या नागरिकांची फसवणूक करण्याचा धंदा सुरू केल्याचे चित्र मीरा-भाईंदर मध्ये घडलेल्या घटनेवरून समोर येत आहे. मीरा भाईंदर मधील,भाईंदर पूर्व येथे कार्यरत असलेल्या एका संस्थेच्या माध्यमातून उद्योग नगर जय अंबे नगर मध्ये अडकलेला कामगारांना गावी पोहोचवण्याच्या नावाखाली दोनशे ₹२०० रुपयाची संस्थेच्या नावाची पावती म्हणून देण्यात येत होती. संस्थेचे अध्यक्ष जाधव यांनी रचलेल्या त्यांच्या षडयंत्राच्या जाळ्यात अनेक कामगार अडकले गेले. शेकडो कामगारांनी त्या पावत्या लाइन लावून फाडल्याचे समजते आहे हजारो-लाखो चा पैसा कमावण्याचा उद्देश ठेवून नागरिकांची फसवणूक करणारा या संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर जाधव हा व्यक्ती श्रमजीवी संघटनेचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात श्रमजीवी संघटनेचे मीरा-भाईंदर चे अध्यक्ष सुलतान पटेल यांनी असे सांगितले की या व्यक्तीला आम्ही संघटनेतून काढून टाकले आहे त्याचा आमच्या संघटनेची कोणताही संबंध राहिलेला नाही पण या घडलेल्या घटनेचा शहरातील विविध स्तरातून निषेध व्यक्त होत आहे या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
अडकलेल्या नागरिकांचा मजबुरीचा फायदा समाजातील काही चाणाक्ष मंडळी या संकट काळात मजबूरी अडकलेल्या लोकांचा गैरफायदा घेण्याचा प्रकार करत आहेत, त्यामुळे यावरती सरकारने बारकाईने लक्ष देऊन असे गैरकृत करणाऱ्या असामाजिक तत्वावर कठोर कारवाई करण्यासाठी तत्परता दाखवून या होणाऱ्या गैर प्रकारांना आळा बसेल याची काळजी घेणे गरजेचे आहे.
पोटपाणी आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी कमी शिकलेला,अल्पशिक्षित ,अडाणी असलेला कामगार मजूर गाव खेड्यातून शहराकडे वळतो आणि काही दिवस शहरात मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबात उदरनिर्वाह चालवतो अशा अल्पशिक्षित लोकांना फसवणाऱ्या मीरा-भाईंदर कामगार वेलफेअर संस्थेचा अध्यक्ष चंद्रशेखर जाधव याला पोलिसांनी बेड्या ठोकून गजाआड केले आहे. ही कारवाई भाईंदर पूर्व येथील नवघरर पोलीस ठाणे मार्फत करण्यात आली असून भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८,२६९,२७१,२९० व कोविड-१९ कायदा २०२० कलम ५१ ब प्रमाणे कारवाई करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत