मुंबईत दारू विक्री दोनच दिवसात करावी लागली अखेर बंद
मुंबई : दारू शौकीन नागरिकांनी येणाऱ्या संधीचा फायदा घेत दोन दिवसात महिन्याच्या साठा जमा केला गेला आहे अशी माहिती खुद्द अनेक तळीरामांशी चर्चा करतांना ऐकायला मिळत होती. कोरोना संसर्ग चे संकट या संकटातुन नागरिकांना वाचवण्यासाठी देशात संचारबंदी, व संपूर्ण देश लॉकडाउन केला गेला दोन टप्पे लॉकडाउन चे पार पडले आहेत तिसरा टप्पा सुरू आहे याचं काळात सरकारने लॉक डाउन मध्ये शिथिलत दिली गेली होतो पण तळीरामांच्या गैरवर्तनामुळे सुरू केलेली दुकाने सरकारला बंद करावे लागले आहेत.
कोरोनाचा प्रलय अजून ही थांबलेला नाही देशासह महाराष्ट्रात मुंबईत कोरोनाचा वाढलेला धोका तसाच सुरू आहे, कोरोनाचा विषाणू गुणाकार करत आहे. गेल्या दीड महिन्यापासून सुरू झालेला लॉकडाउन ठेऊन ही या कोरोना विषाणूची साखळी तोडण्यात म्हणावे तसे यश मिळाले नाही. थोडेफार नियंत्रण ठेवता आले आहे. आता तिसऱ्या टप्प्यात लॉकडाउन चा दोन आठवड्याचा लॉकडाउन वाढवला आहे. या तिसऱ्या टप्यात थोडी ढील देण्याचा प्रयत्न सरकारने केला पण आदतीला मजबूर असलेले तळीराम या ढिलाई चा फायदा घेण्यासाठी तुटून पडले. तर काही तळीरामांनी घराच्या महिलांना ही या कामाला लावले त्यामुळे अनेक महिला ही दारूच्या दुकानासमोर लाईन लावून उभ्या होत्या. त्यामुळे दारूच्या दुकानात वाढलेली गर्दी लक्ष वेधून घेणारी होती लांबच लांब रांगा लागल्या होत्या हे छत्र लक्षात घेता सरकाने सुरू केलेली दारूचे दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळता सगळी दुकानं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्त यानी या बाबतचे आदेश दिले आहेत. मुंबईत मद्यविक्रीही बंद करण्यात आली आहे. मुंबईतील अत्यावश्यक सेवांची दुकानं वगळता सर्व दुकानं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढलेली गर्दी ही कोरोनाचा विळखा तयार करू शकते अशी शंका घेत दुकाने बंद करण्याची मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काल केली होती. या अनुशंगाने दरम्यान दारूची विक्रि ही घाऊक आणि किरकोळ दुकानं बंद करण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत असंही सांगण्यात आलं आहे.काल रात्री हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने तिसऱ्या टप्यातील लॉकडाउन जरी १७ मेपर्यंत वाढवला असला तरीही काही प्रमाणात दुकानं उघडण्याचा निर्णय घेतला होता थोडे फार व्यापार सुरू करण्यासाठी सूट दिली होती. यामध्ये दारूच्या दुकानाचा ही समावेश होता त्यामुळे तळीरामांनी समाधान व्यक्त केले होते पण दोन दिवस सुरू झालेले ही दुकाने बंद झाल्याने तळीरामांच्या तोंडचे पाणी पळवल्या सारखे झाले आहे. दारूच्या दुकानांचे उघडलेले दरवाजे पुन्हा बंद करण्यात आली आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आता नव्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या दुकानांशिवाय सगळं काही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईत आज कोरोना ग्रस्तांची संख्या ही ९ हजार ७०० च्या पुढे गेली आहे. गर्दी टाळण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय आयुक्त प्रवीण परदेशी यांनी घेतला आहे त्यामुळे घाबरलेल्या मुबंईकरांनी समाधानाचा स्वास सोडला आहे.