मीरा-भाईंदर शहरातल्या झोपडपट्टी भागात वाढतोय कोरोनाच्या विषाणूचा प्रभाव मनपाच्या ढिसाळ नियोजनाचा परिणाम

मीरा-भाईंदर शहरातल्या झोपडपट्टी भागात वाढतोय कोरोनाच्या विषाणूचा प्रभाव


 


डोळ्याला न दिसणाऱ्या विषानूने जगाच्या नाकात दम आणून सोडला आहे, तर भातात ही याने विळख्याचे जाळे फैलवले आहे . मुबंई सारख्या घनदाट वस्तीअसलेल्या झोपडपट्टी इलाखे आपल्या कब्जात घेताना दिसत आहे. मीरा-भाईंदर मनपा चा सर्वअधिक भाग हा झोपडपट्टीत विभागला आहे उत्तण पासून ते काजूपाडा, पेनकरपाडा ते घोडबंदर हया परिसरात मोठ्याप्रमाणात दाटीची वस्ती आहे या परिसरामध्येही आता कोरोनाच्या विषाणूने आपले बस्तान बसवणे सुरू केले आहे. मागील काही दिवसांपासून दररोजच्या रुग्णसंख्येत होणारी वाढ ही चिंताजनक तर आहेच पण शासनाची नियोजनातली ढिसाळ वृत्ती नक्कीच याला कारणीभूत आहे. 


मनपा आयुक्त डांगे आणि त्यांचे अधिकारी व समाजसेवेचा दिंडोरा पिटणारे अनेक समाजसेवक एकाच वेळी ५६ रुग्ण  रुग्ण ठीक झाले म्हणून वाहवाह करणारे या दररोज वाढत्या  रुग्णांच्या संख्येवर मात्र चुपी साधून गप्प आहेत  चार दिवसात १३० रुग्ण या शहरात मिळतात पण याचे दोषी कोण आहेत हे मात्र कोणी सांगत नाहीत, इथलं प्रशासन आणि सत्ताधारी भाजपा यांचे हे अपयश आहे का हे विचारण्याची हिंमत मात्र शोशल मीडियावर चमकेशगिरी करणारी आणि आयुक्तांची वाहवाह करणारी मंडळी दाखवतील का ?  हा खरा प्रश्न आहे.  रुग्णठीक होण्याचे श्रेय घेणारे आणि देणारे मागील काही दिवसापासून वाढणाऱ्यां रुग्णां बाबतीत शासनाला आणि सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरतील का त्यांना याचा जाब विचारतील का हा खरा प्रश्न आहे.


ज्या वेळी कोरोनाचे ५६ रुग्ण  ठीक झाले असे सांगितले गेले खरे पाहता चार दिवसांपासून ठीक न होणारा रुग्णांचा एकाच दिवशी जाहीर केलेला हा आकडा आहे असे  नागरिक जाहीर पणे बोलत आहेत जे ५६ रुग्ण ठीक झाले हे जाहीर केले गेले तर त्याच्याच निमित्ताने कोव्हिडं-१९ असलेल्या रुग्णालयातच हा एक प्रकारचा इव्हेंट साजरा केला गेला शहरातील नागरिकांना डिस्टनसिंग चे नियम पाळायला सांगणारे मात्र त्या ठिकाणी नियम धाब्यावर बसवून फोटो चित्रित करतांना पाहिला मिळाले. त्यावेळी कोणतेही शोशल डिस्टनसिंग पाळले गेले नाही त्या वर मात्र हे शोशल मीडियावर बोलणारे चमकेश नेते, पुढरी, सत्ताधारी आणी समाजसेवक मात्र गप्प आहेत.  प्रशासन आणि सत्ताधारी भाजपा यांनी एक ठरवून केलेले स्टंट होता त्या माध्यमातून त्यांनी आम्ही किती चांगले काम करत आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आणि प्रसारमाध्यमा मध्ये प्रसिद्धी ही मिळाली पण हा मनपा च्या शासनाचा आणि सत्ताधाऱ्यांचा डाव लोकांच्या लक्षात आला आहे.


मीरा-भाईंदर शहरातला जे झोपडपट्टी परिसर आहेत त्या  भागात ही लॉकडाउन च्या दोन महिन्यांनंतर या विषाणूचे जाळे पसरायला सुरवात झाली आहे. या दाटवस्त्यांमध्ये हा विषाणू शिरल्यामुळे  या रोगाची साथ शहरात जोर धरू शकते यात काही शंका नाही हा धोका टाळण्यासाठी प्रशासन मात्र गंभीर होऊन उपाययोजना करण्यात ढिलाई करत आहे. असे आरोप नागरिक करत आहेत. या बाबीकडे गंभीरपणे लक्ष दिले गेले नाही तर शहरातली परिस्थिती धोकादायक वळणावर जाईल या साठी सरकारने झोपडपट्टी भागात अधिक लक्ष देणे गरजेचे आहे असे नागरिक भावना व्यक्त करत आहेत.