शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत कुटुंबाचे सामना जळून झाले खाक
देशावर कोरोना साथीचे संकट सुरू आहे. देश लॉकडाउन खाली बंद आहे. सगळीकडे आर्थिक चणचण निर्माण झालेल्या परिस्थितीत मिरारोड परिसरातील आज दुपारच्या वेळी सुंदर नगर कॉम्प्लेक्स मधील विघ्नहर्ता दर्शन या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील एका घरातील जुन्या फ्रिज मध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. या आगीत घरातील सर्व सामान जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.
लॉकडाउन मुळे नागरिक पहिलेच हैराण झाले आहेत. शासनाने दिलेले आदेश पाळत लोक घरातच राहत आहेत. अशा परिस्थितीत मिरारोड परिसरातील आज दुपारच्या वेळी सुंदर नगर कॉम्प्लेक्स मधील विघ्नहर्ता दर्शन या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील एका घरातील जुन्या फ्रिज मध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. या लागलेल्याआगीत घरातील सर्व सामान जळून खाक झाले पण सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. असा संकटमय काळात या कुटुंबाचे हे झालेले नुकसान म्हणजे दुष्काळात तेरावा महिना या प्रचलित काहावती प्रमाणे झाले आहे. एकीकडे कोरोना साथीचा काळ आलेला आहे तर दुसरीकडे हे आगीचे संकट या कुटुंबावर कोसळले आहे. या कुटुंबावर अडचणींचा डोंगर कोसळलेला आहे.
या आगीच्या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली तेव्हा लगेचच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि अर्ध्या तासाच्या नंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. या लागलेल्या आगीत जवळपास साडेतीन लाख रुपयांचे सामान जळून खाक झाले. मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. पण या कुटुंबाची वित्तीय हानी झाल्याची माहिती मिळते आहे. ही आग शॉटसर्किटमुळे लागल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे यांनी दिली आहे.