मीरा भाईंदर मध्ये लॉकडाउन च्या काळात पोलिसांनी केली ३५,७४० वाहनावर  कारवाई १,२८,५४,६०० दंड केला वसूल

मीरा भाईंदर मध्ये लॉकडाउन च्या काळात पोलिसांनी केली ३५,७४० वाहनावर  कारवाई १,२८,५४,६०० दंड केला वसूल


मीरा भाईंदर शहरात लॉक डाउन च्या काळात नियमांचे पालन न करता बिनाकामाचे फिरणारी वाहने मनाई आदेशाची पायमल्ली करून फिरणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनावर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करत जप्त केली होती ती आता परत देण्यात येत आहेत त्यासाठी पोलिसांनी वाहनधारकांना शपथपत्र लिहून देणे बंधनकारक करण्यात आले आहे तेव्हाच जप्त केलेले वाहन परत घेता येईल.


देशात कोरोनचे थैमान पसरले आहे या काळात लॉक डाउन ही वाढत चाललेला आहे अशी परस्थिती निर्माण झाली असतानाच सरकारी यंत्रणा उद्ध पातळीवर कामाला लागली आहे पण त्यांना आतापर्यंत तरी या संकटाला रोखणे शक्य झाले नाही याच काळात काही उपद्रवी नागरिकांनी बिना कामाचे दुचाकी व चार चाकी वाहनांतुन शहरात फिरणे सुरू ठेवले शहरात  कोरोनाचा धोका अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली त्यामुळे मनपा प्रशासनाने अत्यावश्यक सेवेसाठी असलेल्या वाहतूक करणाऱ्यांना पासेस देण्यात सुरवात केली या उपद्रवी मंडळी नी त्याचा ही गैरफायदा घेत अधिकाऱ्यांना चिरीमिरी देऊन पास बनवून घेऊन फिरणे सुरूच ठेवले अत्यावश्यक सेवा देणारे कमी आणि फिरणारे जास्त मिळून येऊ लागले ही बाब जागरूक नागरिकांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली आणि आयुक्तांनी नवीन आदेश काढत अत्यावश्यक सेवा पुरविण्यात येणाऱ्या वाहतूक करणाऱ्या वाहनांना पेट्रोल देण्यात येईल आणि ईतर वाहनांना पेट्रोल देण्यास बंदी घालण्यात आली पण त8तिथेही उपद्रवी लोकांनी बोगस पास बनवून पेट्रोल मिळवणे सुरू केले त्यामुळे या उपद्रवी नागरिकांना लगाम घालण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलत कारवाई सुरू केली आणि २२मार्च ते २२ में पर्यंत ३५, ७४० वाहनांवर गुन्हे दाखल करून ३२ हजार २७९ वाहनावर चलन फाडून दंडात्मक कारवाईत १कोटी २८लाख ५४ हजार ६०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली. तर मनाई आदेशाची पायमल्ली करणाऱ्या नागरिकांवर मीरा-भाईंदर शहरात ७ हजार ९०३ जणांवर गुन्हे दाखल केले गेले आहेत.या कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेली वाहने न्यायालयाच्या परवानगी नंतर दिले जात असतात पण सध्या वाढता लॉक डाउन पाहता आणि तोंडावर आलेले पावसाळ्याचे दिवस पाहता  जप्त केलेली वाहने खराब होऊ नये म्हणून ठाणे जिल्हा पोलिस अधीक्षक शिवाजी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही वाहने तात्पुरत्या स्वरूपात त्या वाहनांच्या मालकांच्या ताब्यात देण्यास सुरुवात केली आहे या वाहन धारकांकडून प्रतिज्ञापत्र घेऊन आणि या लॉक डाउन च्या काळात हे वाहन बाहेर फिरवणार नाही अशी अट देऊन त्यांना त्यांची वाहने परत देण्याचू प्रक्रिया सुरू केली आहे.


काशीमीरा, मिरारोड, नयानगर, नवघर, भाईंदर, उत्तण पोलिसांनी जप्त केलेली ही वाहने चालकांच्या ताब्यात देण्यात येत आहेत यामुळे या वाहनांची संभाळानुक कशी करायची याचे ओझे सध्या तरी हलके होणार आहे. पण उपद्रवी नागरिक पुन्हा त्या वाहनांचा वापर शहरात फिरण्यासाठी करणार आणि संसर्ग वाढण्याची भीती तयार होणार अशी भावना व्यक्त करत आहेत


प्रतिक्रिया


जप्त करण्यात आलेली वाहने ही न्यालायच्या आदेशानुसार परत केली जातात पण सध्या सतत वाढत असलेला लॉकडाउन आणि तोंडावर येऊन ठेपलेला पावसाळा लक्षात घेऊन वाहनांची खराबी होऊ नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपात वाहन धारकांकडून शपथपत्र घेऊन त्यांच्या वाहन ताब्यात देण्यात येत आहे. वाहनधारकांना शपथपत्र लिहून द्यावे लागत आहे की, लॉकडाउन च्या काळात हे वाहन पुन्हा रस्त्यावर आणले जाणार नाही असे शपथ पत्र लिहून घेतले जात आहे आणि त्याची एक प्रत आमच्या पोलिस ठाण्यात जमा केली जात आहे तेव्हाच हे जप्त केलेले जे वाहन आहे ते देण्यात येत आहे


शांताराम वळवी


पोलिस उपअधीक्षक


पोलिस उपविभागीय अधिकारी कार्यालय मिरारोड