लॉकडाऊन चा फायदा घेत महापौरांच्या प्रभागात अनधिकृत बांधकामाचा धुमाकूळ
देशाला कोरोनाच्या संकटाने घेरले असतानाच संपूर्ण देशात हाहाकार माजला आहे तर दुुसरी कडे याच संधीचाा फायदा उठवत चाळ माफियांनी मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये बांधकाम उभारण्यास सुरुवात केली आहे या परिसरात छोटे छोटेेेेे पाडे आहेत या पाड्यावरती आदिवासी समुदायाचे लोकसंख्या बहुसंख्येने राहते त्यांच्या उदरनिर्वाहासाठी असलेल्या शेतजमिनी फियांनी त्यांनी खरेदी करून त्या जमिनी वरती चाळी उभा करण्याचे हा मोठ्या प्रमाणात कामसुुुरू केल्यामुळे शेतजमिनी चाळीत तबदिल झाल्या आहेत या माफियांना स्थानिक नगरसेवकांचा आशीर्वाद आणि मनपा प्रभाग अधिकाऱ्यांची कृपादृष्टी असल्यामुळे येथे अवैध बांधकामांना नेहमीच पेव फुटलेले असते सध्याच्या या संकट काळातही हे चाळ माफिया बिनधास्तपणे चाळी बनवताना दिसत आहेत.
मिरा भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती क्रमांक सहा मध्ये काजुपाडा ते गावठण या हायवे रोड लगतच्या पट्ट्यामध्ये अनेक भागात त्यांनी आपले बस्तान बसवलेले आहे. या पट्ट्यात अनेक चाळ माफिया सक्रिय असल्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात चाळीच्या चाळी उभ्या केल्या जातात यासंदर्भात अनेक नागरिकांनी मनपा कार्यालयात तक्रारी केल्या असतानाही त्यावरती मनपाकडून होणारी कारवाई ही फार नगण्य स्वरूपाची असते. या माफियांना स्थानिक लोकप्रतिनिधींचे आशीर्वाद तर प्रभाग अधिकाऱ्यांची काळा लक्ष्मीच्या लालसेपोटी केलेली कृपादृष्टी त्यांच्या पाठीशी असल्यामुळे हे चाळमाफिया कुठे छुप्या पद्धतीने तर कुठे स बिनधास्तपणे अवैद्य चाळी उभा करण्याचे काम केले जाते सध्या देशात कोरोना चा विषाणूने थैमान घातले असताना या विषाणूला रोखण्यासाठी देशात सुरू असलेला लॉक डाउनचा गैरफायदा घेत काही चाळमाफियांनी कुठे चोरी चुप या मार्गाने तर कुठे बिनधास्तपणे तळी उभा करण्याचे काम सुरू केले आहे मांडवीपाडा, मीनाक्षी नगर, माशाचा पाडा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात चाळी उभ्या केल्या जात आहेत या परिसरात चाळमाफिया सक्रिय झाल्यामुळे त्या परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे यासंदर्भात काही नागरिकांनी व पोलीस मदत पत्रच्या माध्यमातून या विभागातील नगरसेविका आणि सध्याच्या या शहराच्या महापौर जोस्तना हसनाळे यांच्याकडे फोनद्वारे संपर्क साधून यासंदर्भातली त्यांना माहिती देण्यात आली पण याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करून त्या माफियांना वाचविण्याची भूमिका महापौरांनी घेतल्यामुळेच या चाळ माफिया वरती कारवाई होताना दिसत नाही. लोकप्रतिनिधी आणि शासनाचे साटेलोटे हेच या परिसरात उभ्या राहणाऱ्या चाळींच्या वाढत्या प्रमाणाला कारणीभूत आहे असे स्थानिक नागरिकांनी उघडपणे बोलून दाखवले आहे. अनेक नागरिकांना ही भीती निर्माण झाली आहे सध्या कोणामुळे हैराण झालेला नागरिक लॉकडाउनच्या काळात घरातच राहून सरकारच्या नियमावलीचे पालन करणाऱ्या नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे वेगवेगळ्या ठिकाणाहून येणाऱ्या कामगारांच्या माध्यमातून या परिसरात कोरोनाचा फैलाव तर होणार नाही ना या भीती खाली या परिसरातील नागरिक राहत आहेत या परिसरातील नागरिकांनी माननीय आयुक्त महोदयांना विनंती केली आहे की, या परिसरात सुरू असलेले अवैध बांधकामे तात्काळ थांबवले जावेत आणि जे चाळ माफिया हे अवैध बांधकामे उभारत आहेत त्यांच्या वरती योग्य ती कायदेशीर कारवाई करावी आणि शासनाचा अधिकाऱ्याकडून अप्रत्यक्षपणे या कामाला पाठिंबा देत असलेल्या अधिका-यावरती तात्काळ कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून जोर धरताना दिसत आहे.