मीरा-भाईंदर शहरात आता कोविड-१९ साठी ४ रुग्णालय, तर सहा ठिकाणी कोविड-१९ हेल्थ सेंटर
मुंबई महानगराला लागून असलेल्या मिरा भाईंदर शहरामध्ये दिवसंदिवस वाढती कोरोना रुग्णाची संख्या पाहता शहरात अन्य रुग्णालये कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी सुरू केली आहेत. प्रथम मनपाचे एकमेव असलेले पंडित भीमसेन जोशी रुग्णालय हे या कोविड-१९ साठी सुरू करण्यात आले होते आता या रुग्णालया व्यतिरिक्त शहरात तीन अन्य रुग्णालय हे कोविड-१९ च्या रुग्णाकरिता रूग्णालय म्हणून घोषित करण्यात अली आहेत.
मीरा-भाईंदर मनपा क्षेत्रातील वाढती कोरोनाच्या रुग्णांची संख्या लक्षात घेता शहरात मनपाचे एकमेव असलेले पंडित भीमसेन जोशी रुग्णालय हे कोविड १९ च्या साठी सुरू केले होते यात १०० बेड चे हे रुग्णांसाठी तयार करण्यात आले होते. पण वाढते रुग्ण पाहता हे रुग्णालय कमी पडू लागले त्यामुळे अधिक रुगणालाय हवे होते याकरिता स्थानिक प्रशासनाणे मिरारोड येथील वोखार्ड हॉस्पिटल, फॅमिली केयर हॉस्पिटल आणि पी.बी. दोशी रुग्णालयांचा समावेश कोविड १९ च्या रुग्णांसाठी सुरू केले आहे. या तीन नवीन सुरू करण्यात येत असलेल्या कोविड १९ रुग्णालयात ३०० बेडची सोय करण्यात आली आहे. तर शहरातील सहा ठिकाणी कोविड-१९ हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले आहेत त्या ठिकाणच्या सेंटर ला कोविड १९ नावानी घोषित करण्यात आली आहे.या सेंटरमध्ये शहा लाईफ लाईन हॉस्पिटल, तुंगा हॉस्पिटल, चिरायू हॉस्पिटल, गॅलक्सि हॉस्पिटल, ऑरबीट हॉस्पिटल आणि नेफ्यु हॉस्पिटल यांचा कोविड-१९ हेल्थ सेंटर रुग्णालयात समावेश आहे. या सहा रुग्णालयात ही ३०० बेडची सोय करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त मिरा रोड येथील एक इमारतीला कोविड केयर सेंटर म्हणून घोषित करण्यात आला आहे. या इमारती मध्ये ८०० रुग्णांना ठेवण्यासाठी सोय करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेने मोठी उपाययोजना केली आहे. मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
मिरा भाईंदर मध्ये आज ४ रुग्ण नवीन रुग्ण आढळले आहेत. शहरात कोरोनाचे लागण झालेले एकूण १५७ रुग्ण झाले आहेत तर अजून ७० जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. तर आतापर्यंत ४४ कोरोनाची लागण झालेले रुग्ण बरे झाले असून २ कोरोना बाधितांचा मृत्य झाला आहे. तर नवीन रुग्णामध्ये १५ नंबर बस थांबा जवळ मंगलनगर येथील ३३ वर्षीय पुरुष, १५ वर्षा ची मुलगी तर ६ वर्षा च्या मुलीला कोरोनाची लागण झाली आहे. महिला तर एक १५ आणि ६ वर्षीय लहान मुलीचा समावेश आहे. नवीन रुग्णामध्ये भाईंदर पश्चिमेच्या राम मंदिर रोड येथे ६९ वर्षीय महिलेला कोरोना बाधित झालेली आढळून आली आहे. या नवीन कोरोना रुग्णांमध्ये ३ रुग्ण हे कोरोना पेशंटच्या संपर्कात आल्याने बाधीत झाले आहेत तर १ जण नविन रुग्ण आहे.