८ में च्या मध्यरात्री पासून ते १२ में पर्यंत मीरा-भाईंदरकरांसाठी आयुक्तांनी काढले असे आदेश
संपूर्ण देशाला कोरोना ने जेरीस आणले आहे नागरिकांमध्ये पसरलेली धास्ती सर्वांना बेचेन करणारी आहे मीरा भाईंदरमध्ये १००% लॉकडाऊन करूनही करुणा रुग्णांची संख्या थांबत नाही त्यामुळे शहरातील नागरिकात भितीदायक वातावरण तयार झाले आहे.
शहरात अडकलेले कामगार,मजूर,इतर वर्ग त्याचबरोबर लॉकडाउन मुळे बंद झालेले काम घरात पडत चाललेला अन्नधान्याचा तुटवडा, हातात येणारा बंद झालेला पैसा ,आणि उन्हाळ्याचे दिवस वर्षाची कमाई करून येणाऱ्या पावसाळ्यात घरी राहून कुटुंब चालवण्याचे नियोजन केले जात असे आता आता तेही बंद झाल्यामुळे भविष्याची चिंता वाढत आहे.
कोरोनाचा वाढता हाहाकार थांबण्याचे नाव घेत नाही, दररोज नवीन रुग्णांची होत असलेली वाढ साठवणूक केलेला संपत आलेला पैसा आणि वाढत चाललेला लॉकडाउन यामुळे रुग्ण कमी होण्यासाठी काही फरक पडलेला दिसत नाही. १४ दिवस शहर १००% लॉकडाउन केले गेले पण नवीन रुग्ण थांबता थांबत नाहीत आज मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी नवीन आदेश काढत
मिरा भाईंदर शहरातील ८ में ते १२ में पर्यंत काय सुरू असेल आणि काय बंद राहील या संदर्भात आदेश जाहीर केले आहेत . या मध्ये किराणा दुकान बिग बाजार, डी मार्ट, स्टार बाजार, ई शॉपिंग व्यतिरिक्त बेकरी सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत,
डेरि सकाळी ७ ते ११ पर्यंत, औषधाची दुकाने सकाळी ९ ते रात्री ९, पंमचर ,ए सी ,फ्रीज
दुरुस्ती, झेरॉक्स,गॅरेज
स्टेशनरी , हार्डवेअर
इलेक्ट्रिक दुकाने सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. भाजी मार्केट पूर्णतः बंद राहील, भाजीपाला, मटण, मच्छी,मार्केट बंद असेल ( केवळ घरपोच सेवा) सकाळी ९ ते रात्री ११अशी असेल
रुग्णालयाजवळ २४ तास औषधी दुकाने खुले असतील. व इतरत्र असलेली औषधी दुकाने सकाळी ९ रात्री ९ पर्यंत सुरू राहतील.