भ्रष्टाचाराने खाकीवर्दीला बदनाम करणारे नवघर पोलिस ठाण्याचे पोलिस

भ्रष्टाचाराने खाकीवर्दीला बदनाम करणारे नवघर पोलिस ठाण्याचे पोलिसभ्रष्टाचाराने खाकीवर्दीला बदनाम करणारे नवघर पोलिस ठाण्याचे पोलिसभ्रष्टाचाराने खाकीवर्दीला बदनाम करणारे नवघर पोलिस ठाण्याचे पोलिसभ्रष्टाचाराने खाकीवर्दीला बदनाम करणारे नवघर पोलिस ठाण्याचे पोलिस


■ मेडिकल दुकांनदारावर केला जातोय तक्रार मागे घेण्यासाठी दबाव
■ दोषींना वाचविण्यासाठी पोलिस प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहे


भाईंदर- काळ्या कमाईची लत लागलेल्याना मेहनतीची कमाई नेहमी कमीच पडत असते. भ्रष्ट मार्गाने पैसा कमावण्याची सवय लागलेल्या किती ही नेक मार्ग द्या ते त्यात भ्रष्ट्राचार करणारच यात शंका नाही. असेच काही नवघर पोलीस ठाण्याचे पोलिस भ्रष्टाचारामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. मेडिकल दुकानदारांकडून पैसे मगितल्याची तक्रार पोलिस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांच्याकडे केल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे.


नवघर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नवघर रोड येथील श्रीराम ज्वेलसच्या समोर रामफेर शुक्ला यांच्या मालकीचे दर्शन केमिस्ट मेडिकल (औषधाचे दुकान) आहे. त्या दुकानातून रेडबुल 'थंड शीतपेय' विकले जात आहे म्हणून मेडिकल दुकान मालकाला व काम करणारा कर्मचारी (फार्मासिस्ट) यांना पोलिसांनी पकडून नवघर पोलीस ठाण्यात घेऊन आले. व त्यांच्यावर भीतीचा दबाव बनवत तीन महिने जेलमध्ये घालण्याची धमकी देण्यात आली या प्रकरणातून बाहेर पडायचे असेल तर एक लाख रुपये द्यावे लागतील अन्यथा तुमच्यावर गुन्हा दाखल करू व मेडीकल दुकानाचा परवानाही रद्द करू अशी भिती दाखवून,  मेडिकल चालकांचे कपडे काढून त्याची झाडाझडती घेण्यात आली व त्याच्या खिशातील ७ हजार रुपये काढून घेण्यात आले तर त्याच्या बोटातील अंगठी काढण्याचा प्रयत्न केला गेला आणि लॉकप मध्ये बसवण्याची धमकी दिली गेली घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या मेडिकल मालकाला एका तेंव्हा मध्यस्थी व्यक्तीने म्हटले की एकजण पैसे घेऊन येत आहे असे म्हणत आलेल्या माणसाने बारा हजार तीनशे रुपये देऊन आपली पोलिसांच्या तावडीतून सुटका करून आले व नंतर त्यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
 


नवघर पोलीस ठाण्यातील काही अधिकारी व कर्मचारी मिळून असा पद्धतीने हैराण करून त्यांच्याकडून पैसे उखळत असतात असी व्यापारी वर्गात चर्चा ऐकायला मिळते आहे. कर्मचारी किरण मारोती घुगे बक्कल नंबर ३४१२ यांनी व त्यांच्या सोबत असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांनी नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनावट केस करण्याच्या घाट घालून पैसे उखळण्याचा चंग बांधला आहे असी परिसरातील छोटे छोटे व्यापारी चर्चा करत आहेत. तर काही  पोलिस आणि व्यापाऱ्या मघ्ये दबक्या आवाजात  ही पण चर्चा होतांना दिसत आहे की, पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांच्या खास मर्जीतले घुगे आहेत त्याच बरोबर ठाण्याच्या हद्दीतील सर्व अवैध धंदे व दोन नंबरच्या कामाचे पानटपरी पासून ते सर्वच ठिकानी  वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या नावाचे पैसे गोळा करण्याचे काम हा पोलीस कर्मचारी घुगे करत असतो. 


मेडिकल दुकानं दाराने पैसे घेतल्याचा आरोप केल्याने पोलिसांच्या वर्दीला कलंकित करण्याचे काम या पोलिस ठाण्यातिल काही अधिकारी कर्मचारी करत आहेत का हा प्रश्न निर्माण होत आहे. या घडलेल्या प्रकरणाने हे नवघर पोलिस ठाणे वादग्रस्त ठरले आहे. पोलिस अधीक्षक राठोड यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत भाईंदर उपविभागीय अधिकारी शशिकांत भोसले यांना या प्रकरणाची तपासणी करण्यास सांगितले आहे. घडलेल्या प्रकारचा निःपक्ष तपास झाल्या नंतर कोण कोण कर्मचारी अधिकारी यांचा समावेश आहे, याचा उलगडा होईलच तसे काम उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी चोकशी करण्याचे काम सुरू केले आहे. करण्याचे काम सुरू आहे. 


मेडिकल दुकान मालक  रामफेर शुक्ला यांच्या मते पोलिसांनी त्याच्या आधी घेऊन गेलेल्या माणसांना सोडण्यासाठी त्याच्याकडे एक लाखांची मागणी केल्याचे सांगितले. वीस हजार रुपये देण्यावर तडजोड झाली तर एक हजार तीनशे रुपये कमी पडले होते ते पैसे घेण्यासाठी अजय तिवारीत नामक व्यक्ती आला होता पण मी त्याला पैसे दिले नाही तर त्याला सांगितले की ,मी पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे बाकी राहिलेले पैसे देणार नाही. तर तकरारदार यांनी विभागिय पोलिस अधिकारी यांच्याकडे आपले स्टेटमेंट दिले आहे. त्यामुळे माझ्यावर पोलिसांकडून दबाव आणून दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी  दबाव आनने सुरू असल्याचे आसांगितले.


प्रतिकिर्या


रोहित सुवर्णा, 
समाजसेवक


कोरोना सारख्या महामारीच्या काळात एकीकडे पोलिस जीवाची पर्वा न करता या संकटाचा मुकाबला करत आहेत तर काही भ्रष्ट कर्मचारी, अधिकारी कर्तव्यात कसूर करून हप्ताखोरी करत आहेत हे या घडलेल्या प्रकारामुळे उघड झाले आहे. नवघर पोलीस दलातील त्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी व पैसे घेतल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात यावी, गुन्हा दाखल करण्यात येऊन जे जे दोषी आहेत त्यांना तातडीने जबाबदार धरून त्यांना निलंबित करावे.


प्रतिकिर्या


तक्रार आलेली आहे घडलेल्या प्रकाराचा  तपास सुरू आहे. या प्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल कोणालाही पाठीशी घातले  जाणार नाही. 
शशिकांत भोसले
उपविभागीय पोलिस अधिकारी भाईंदर