दोन पोलिस कर्मचाऱ्यांचं निलंबन, पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईची लटकती तलवार
■ मेडिकल दुकांनदारावर केला जातोय तक्रार मागे घेण्यासाठी दबाव
■ दोषींना वाचविण्यासाठी पोलिस प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहे
भाईंदर-भ्रष्टाचार करून गैर मार्गाने पैसा कमावण्याचा मनसुबा ठेवणाऱ्या नवघर पोलिस ठाण्याच्या दोन पोलिसांचे अखेर निलंबन झाले आहे तर या साखळीत सामिल असलेले अधिकारी आज तरी मोकाट आहेत. त्यामुळे वादाच्या भोवऱ्यात असलेले अधिकारी या मेडिकल दुकानदारांवर पैसे मगितल्याची तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणत असल्याच्या चर्चेने शहरात उधाण आले आहे.
या प्रकरणाची बातमी आम्ही "भ्रष्टाचाराने खाकीवर्दीला बदनाम करणारे नवघर पोलिस ठाण्याचे पोलिस" या मथळ्याखाली प्रकाशित केली होदोन पोलिस कर्मचाऱ्यांचं निलंबन, पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईची लटकती तलवारती.याच प्रकरणातील दोन पोलिस शिपाई निलंबित करण्यात आले आहेत तर काही पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईची लटकती तलवार आहे.
नवघर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नवघर रोड येथील श्रीराम ज्वेलसच्या समोर रामफेर शुक्ला यांच्या मालकीचे दर्शन केमिस्ट मेडिकल (औषधाचे दुकान) आहे. त्या दुकानातून रेडबुल 'थंड शीतपेय' विकले जात आहे म्हणून मेडिकल दुकान मालकाला व काम करणारा कर्मचारी (फार्मासिस्ट) यांना पोलिसांनी पकडून नवघर पोलीस ठाण्यात घेऊन आले. व त्यांच्यावर भीतीचा दबाव बनवत तीन महिने जेलमध्ये घालण्याची धमकी देण्यात आली या प्रकरणातून बाहेर पडायचे असेल तर एक लाख रुपये द्यावे लागतील अन्यथा तुमच्यावर गुन्हा दाखल करू व मेडीकल दुकानाचा परवानाही रद्द करू अशी भिती दाखवून, मेडिकल चालकांचे कपडे काढून त्याची झाडाझडती घेण्यात आली व त्याच्या खिशातील ७ हजार रुपये काढून घेण्यात आले तर त्याच्या बोटातील अंगठी काढण्याचा प्रयत्न केला गेला आणि लॉकप मध्ये बसवण्याची धमकी दिली गेली घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या मेडिकल मालकाला एका तेंव्हा मध्यस्थी व्यक्तीने म्हटले की एकजण पैसे घेऊन येत आहे असे म्हणत आलेल्या माणसाने बारा हजार तीनशे रुपये देऊन आपली पोलिसांच्या तावडीतून सुटका करून आले व नंतर त्यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली होती . या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिस कर्मचारी किरण घुगे आणि अमोल राऊळ यांना निलंबित केले असले तरीही यांच्या सोबत साखळी बनवून काळ्या कमाईत हिस्सा बनवणारे अधिकारी अद्याप तरी मोकाटच आहेत अशी चर्चा दबक्या आवाजात पोलिसांत सुरू आहे.पण पोलिस अधीक्षक डॉ शिवाजी राठोड यांनी मात्र या प्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नाही असी भूमिका घेतली आहे . सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल असी माहिती दिली आहे तर या औषध विक्री (मेडिकल दुकानदार) दुकानं दारावर मात्र काही जणांच्या माध्यमातून दबाव आणून तक्रार मागे घेण्यासाठी प्रयत्न केला जात आहे असे तक्रारदाने स्पष्ट केले आहे.
नवघर पोलीस ठाण्यातील या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाकडून होत असलेल्या वर्तनामुळे व्यापारी वर्ग भयभीत झालेला आहे. या पोलिस ठाण्यात गैर मार्गाने पैसे घेऊन पोलिस चुकीचे काम करतात या मुळे हे पोलिस ठाणे जिल्ह्यात नेहमीच चर्चेत राहिले आहे. काही कर्मचारी आणि अधिकारी यांच्या गैरवर्तना मुळे संपुर्ण पोलिसांना बदनामीचा सामना करावा लागतो इमानदारीने काम करत असलेले कर्मचारी यांची या मुळे कोंडी होत असते असे नाव न जाहीर करण्याचा अटीवर काही अधिकारी या शहरातले बोलत आहेत त्यामुळे नागरिकांत पोलिसांप्रति बनणारी प्रतिमा ही वेगळी बनत असते या वर वरिष्ठांनी बारकाईने लक्ष द्यावे असेही काहींना वाटते आहे.
पैसे घेतल्याचा आरोप केल्याने पोलिसांच्या वर्दीला कलंकित करण्याचे काम करणाऱ्या दोन पोलिस शिपायांना निलंबित करण्यात आले आहे तर त्यांच्या साखळीतील असलेल्या पोलिस ठाण्यातिल काही अधिकारी यांच्यावर कारवाई कधी होणार की त्यांना वाचवले जाणार हा प्रश्न नागरिकां मधून विचारला जात आहे. या घडलेल्या प्रकरणाने हे नवघर पोलिस ठाणे वादग्रस्त ठरले आहे. पोलिस अधीक्षक डॉ राठोड हे या अधिकाऱ्यांवर वरिष्ठांच्या आदेशानुसार काय कारवाई करणार आहेत या कडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.