मीरा-भाईंदरमधील बिहार कडे जाणाऱ्या १२०० कामगारांचा संपूर्ण खर्च उचलणार काँग्रेस कमिटी - मुजफ्फर हुसेन
कोरोनाचा वाढता फैलाव आपल्या कुटुंबाचे पोटपाणी भरण्यासाठी गाव सोडून शहरात आलेला कामगार, मजूर देशात गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेला लॉकडाउन मुळे गेलेले हाताचे काम पैसा नाही काम नाही खायचे काय या चिंतेत असलेल्या मजूर ,कामगारांना गावी कधी कसे पोहचता येईल हा प्रश्न भेडसावत असतांना त्यांना धीर देण्याचे काम काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. कॉंग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केलेल्या घोषणेनंतर अडकलेल्या कामगार,मजूर याना आपल्या मूळगावी जाण्याचा,खाण्याचा खर्च राज्य प्रदेश काँग्रेस कमिटी उचलेल अशी माहिती काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांनी दिली आहे.
या महामारीच्या काळात केंद्र सरकारने केलेल्या रेल्वे तिकीट भाडेवाढीबाबत संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. तर कामगारांच्या, मजुरांच्या हातात नसलेल्या पैसा अशा मजूर,कामगारांना त्यांच्या गावी पोहचवण्याची जबाबदारी, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी घेणार आहे अशी माहिती पक्षाचे प्रदेश कार्यअध्यक्ष मुजफ्फर हुसेन यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. त्यात त्यांनी मीरा-भाईंदर येथे राहणाऱ्या १२०० बिहारी मजुरांची यादी मानपा आयुक्त, पोलिसअधीक्षक आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांना दिली असल्याचे सांगितले. या १२,००० मजुरांचे संपूर्ण भाडे राज्य प्रदेश कॉंग्रेस कमिटीकडून दिले जाईल, जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविण्यात आले असून काँगेस पक्षाच्या कार्यकर्त्या कडून यादी बनावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ते म्हणाले की प्रदेशाध्यक्ष बासाहेबसाहेब थोरात यांच्या आदेशानंतर शहरातील कॉंग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांनी लॉकडाउन मध्ये अडकलेल्या मजूर, कामगारांची यादी बनवण्यास सुरू केली व प्रशासनाच्या नियमांनुसार कागतपत्रे जमा करण्याचे काम सुरू आहे
केंद्र सरकारकडून सांगण्यात येत आहे की, केंद्र सरकार सांगताय8 की ८५% देण्यात येत असलेल्या रेल्वेच्या तिकीट,भाडे देण्यात येत आहे. हे एक राजकीय बोलण्याचे प्रलोभन आहे असे काही सरकार करत नाही त्यांच्या या दाव्यात कोणतेही तथ्य नाही. उलट अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तिकीट भाडे अधिक करत आहे. केंद्र सरकार आपले अपयश लपवण्यासाठी खोटे बोलत आहे. असे गंभीर आरोप केंद्र सरकार वर केले आहेत. श्रीमंतांना मदत करणारी केंद्र सरकार मात्र अडचणीत सापडलेल्या गरीब कामगार, मजूर यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. भाजपा खोटयाचा आधार घेत आपली होत असलेली नामुसकी लपवत आहे.
१२०० कामगारांच्या सरकार च्या वतीने ट्रेनचा वेळ आणि स्थान फोन व एसएमएसद्वारे सांगितले जाईल. ज्यांना प्रशासनाकडून अधिकृत माहिती मिळेल, तेच लोक प्रशासनाच्या मदतीने ट्रेनमध्ये घेतले जातील. एरव्ही कोणत्याही नागरिकांनी कृपया गर्दी करू नका. अशी विनंती मुजफ्फर हुसेन यांनी नागरिकांना केली आहे.