त्रिभुवन धुरिया फाउंडेशन ने ओळखला भुकेसोबतचा संघर्ष

त्रिभुवन धुरिया फाउंडेशन ने ओळखला भुकेसोबतचा संघर्ष


  एक हजारा पेक्षा अधिक कुटुंबांना दिला मदतीचा हात



अन्नधान्याचे किट घरपोच करून देणाऱ्या या त्रिभुवन धुरिया फाउंडेशन ला अनेक गरिबांनी  आशिर्वाद दिले आहेत. या संकटाच्या काळात जे हात मदतीला धावून जात आहेत असे असंख्य हात सेवेसाठी देशभर कार्यरत आहेत,त्या मधला खारीचा का होईना वाटा उचलण्याचे काम हे त्रिभुवन धुरिया फाउंडेशन करत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही हे मात्र नक्की आहे. 
       कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देश लॉक डाऊन आहे या लॉक डाऊन मध्ये त्रिभुवन धुरिया फाऊंडेशन ची संपुर्ण टीम जमेल तशी मदत कार्य करण्यात जुंपली गेली आहे. सध्या च्या परिस्थिती मध्ये कोरोनाच्या लढ्यात जे भुकेसोबत संघर्ष करत आहेत,ज्यांना एक वेळच जेवण मिळत नाही,जे उपासमारीमुळे हैराण आहेत,ज्यांच्या घरात चूल पेटत नाही,जे भिक्षा मागून जगणारे आहेत, अडकलेले प्रवासी आहेत,मजूर आहेत अश्या गरजू लोकांपर्यंत पोहचवण्याचे ठरवले होते आज त्यामुळेच जास्त नाही पण खारीचा वाटा उचलण्याचं भाग्य आम्हाला मिळाले आहे  आपल्या सर्वांचे आशिर्वाद पाठीशी खंबीरपणे उभे आहेत म्हूननच हे सगळं शक्य आहे असा भावनिक प्रतिकिर्या या फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त  केल्या आहेत. तर पोलिस कर्मचारी यांना पिपई किट चे वाटप असो या वस्त्या ,वस्त्यात सुरू केलेली जंतुनाशक फवारणी असो जमेल तशी मदत करण्यात येत आहे अशी माहिती या त्रिभुवन धुरिया फाउंडेशन चे कल्पेश लोके यांनी दिली आहे.


        कोरोनाच्या तीव्रतेच्या मुळे हैराण झालेला नागरिक आणि अडकलेला प्रत्येक जण हवालदिल अवस्थेत जगतांना अन्नाचा पैसा अभावी निर्माण झालेला घरातला तुटवडा कसा भागवणार या चिंतेत असलेल्या एक हजारापेक्षा जास्त घरांची ही चिंता दूर करण्याचा प्रयत्न  "त्रिभुवन धुरिया फाउंडेशन" ने केला आहे. गरीब आणि गरजू नागरिकांना मोफत धान्य वाटप करून त्यांची चूल पेटवण्याचा प्रमाणिक पणे प्रयत्न, व ही काळाची गरज मानुन या फाउंडेशन ने मदतीचे हात पुढे केले आहेत.
     कोरोनाचे हे सर्व संकट आज ना उद्या संपेल अशी अपेक्षा तर आहे  पण काळ आणि वेळ सध्यातरी सांगता येत नाही . हे देशात आलेले संकट एकदाचे  संपावे व सर्व पहिल्या सारखे सुरळीतपणे सुरू व्हावे बस एवढीच आस सगळ्यांना लागली आहे