कोरोनाची काळोखी छाया कोरोनाने मीरा-भाईंदर शहरात घेतला चौथा बळी
कोरोनाची काळोखी छाया जगावर पडलेली आहे, या छोट्याशा विषाणूच्या भीतीने अख्या जगात थरकाप उडवला आहे. भारतात आकडा थांबण्याचे नाव घेत नाही तर महाराष्ट्र आघाडीत राहिला आहे.मुंबई शहरात कोरोनाने जाळे पसरवले आहे,त्याच धर्तीवर मुंबई प्रवेशद्वाराला लागूनच असलेल्या मिरा-भाईंदर शहरात कोरोनाच्या संख्येने जनजीवन विस्कळीत व हवालदिल झाले आहे. शहराचा कोरोना ग्रस्तांचा आकडा आता १८१ पोहचला आहे तर ठीक होण्याचे प्रमाण वाढत आहे तर मृत्यू चा आकडा ही वाढतो आहे.
गेल्या दीड महिन्यापासून देशात सुरू झालेला लॉकडाउन, शहरातली घनदाट वस्ती, उन्हाळ्याचे दिवस, यामुळे हैरान झालेले नागरिक या कोरोनाच्या कोंडीतून कधी सुटका होईल याची वाटपहात आहेत. राज्यासह शहरातल्या नागरिकांना हालाखीचे जीवन जगावे लागत आहे. रोज मजुरी करून पोट भरणारे परिवार अक्षरशः भुकेपोटी व्याकुळ होत आहेत. सरकार आपल्या परीने प्रमाणिक पणे प्रयत्न करत आहे पण दुसरीकडे निकृष्ट दर्जाचे अन्न नागरिकांना मिळत आहेत अशा प्रकारच्या नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. याच काळात कोरोना चे संक्रमण थांबता थांबत नाही. शहरात दररोज वाढणाऱ्या नवीन रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे सोमवारी नवीन आठ रुग्ण तर दोन संपर्कातील असे एकूण १० रुग्ण आढळून आले आहे हा वाढता आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. भाईंदर पश्चिम येथील शिवसेना गल्ली मध्ये राहणाऱ्या ५० वर्षीय इसमाला कोरोनची लागण झाल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल केले होते. त्या ठिकाणी उपचार चालू असताना कोरोना विषाणूने त्याचा बळी घेतला आहे. रविवारी रात्री या इसमाचा मृत्यू झाला आहे.भाईंदर पश्चिम मधील हा कोरोना ने घेतलेला पहिला बळी आहे. तर मीरा-भाईंदर मधला चौथा बळी ठरला आहे.
भाईंदर पश्चिम मध्ये दररोज नविन रुग्ण आढळून येत आहेत पश्चिम मधला काही भाग हॉस्पॉट बनतो की काय ही शंका नागरिकांत उपस्थित होतांना दिसत आहे. काल शहरात कोरोना विषाणूची लागण झालेले मिळून आलेले ९ रुग्ण हे भाईंदर शहरातले आहेत तर एक मिरारोड पूर्व मधील आहे. भाईंदर पूर्व मध्ये न्यू गोल्डन नेस्ट फेज-७,फेज-८, कस्तुरी पार्क ,नवघर रोड, खारीगावं,आयडियल पार्क, सिद्धिविनायक रुगणालाय मार्ग भाईंदर पश्चिमेला जे पी ठाकूर मार्ग, बमोदीपटेल रोड, येथे मीरा रोड रॉयल पार्क एम जी रोड येथे रुग्ण आढळून आले आहेत.