मीरा भाईंदर मध्ये दोन पोलिस कर्मचारी कोरोना संक्रमित आढळले
मिरारोड:-
कोरोनाचा भीषण कहर संपुर्ण जगभरासह भारतात ही थयथयाट करत आहे तर महाराष्ट्रात मुंबई सह आजूबाजूला वसलेल्या वस्त्यामध्ये कोरोनाची तीव्रता झपाट्याने वाढत आहे. जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी कोरोनासी दोन हात करणारे डॉक्टर, पोलिस व इतर कर्मचारी वर्ग कोरोनाच्या साखळीत खेचला जात आहे. महाराष्ट्रात अनेक पोलिस कर्मचारी कोरोनाने ग्रस्त झाले आहेत तर अनेकानां आपले प्राण गमवावे लागले आहे. मिरा-भाईंदरच्या पोलिसात आता पर्यंत शिरकाव न केलेल्या कोरोनाने मिरारोड मधील दोन कर्मचारी कोरोनाचे ग्रस्त झाले आहेत.
मीरा-भाईंदर शहरात वाढते कोरोना रुग्ण पाहता या छोट्याशा शहराची चिंताजनक परस्थिती निर्माण होत आहे. दररोज रुग्णांचा मिळून येणारा आकडा हा चिंता वाढवणारा आहे. कोरोनापासून नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी कोरोना या विषाणू सी झुंज देणारे योध्ये या संक्रमणाच्या विळख्यात अडकत असणारे आकडे समोर येत आहेत. महाराष्ट्रात कोरोनाने अनेक पोलिसांना ग्रस्त केले आहे. अनेकांचे प्राण ही घेतले आहेत आता पर्यंत मीरा-भाईंदर मधील पोलिस कर्मचाऱ्या पर्यंत न पोहचलेला कोरोना आता पोहचला आहे मीरारोड पोलिस ठाण्यात नोकरी करत असलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना या विषाणूची लागण झाल्यामुळे शहरातील कर्मचाऱ्यात खळबळ उडाली आहे.
मीरा भाईंदर मधील पोलीस दलातही कोरोनाने शिरकाव केला आहे. मीरारोड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री उघडकीस आला आहे.त्यातील एका कर्मचाऱ्याला शाहपुर तर दूसऱ्याला ठाण्यातील रुग्णालयात उपचारा करता भरती करण्यात आले आहे. विशेष म्हणजे जवळपास १२०० पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस येत आहे. तर आतापर्यंत १० पेक्षा अधिक पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे.या मुळे मीरारोड पोलिस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्या ना कोरोनाची लागण झाल्याची समजताच मिरारोड पोलिस ठाण्यातील सर्व पोलिस अधिकारी,कर्मचारी यांची शनिवारी वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
कोरोनाच्या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशात संचारबंदी,लॉकडाऊन केला गेला याची कडक अंमलबजावणी व्हावी या करीत सगळीकडे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. त्यासाठी पोलिस कर्मचारी आपल्या जिवाजी पर्वा न करता रात्रंदिवस चोखपणे आपले कर्तव्य पार पाडत आहेत. मिरा भाईंदर मध्येही पोलिसांनी उत्तम कामगिरी केली आहे तर शहरातील आता पर्यंत एकाही पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली नव्हती. पण शुक्रवार या दिवस मात्र याला अपवाद ठरला आणि दोन कर्मचारी संक्रमित असल्याचे आढळून आले. हे कर्मचारी मिरारोड येथील एस. के. स्टोन,सिने मैक्स किवा ईतर ठिकाणी नाक्यावर बंदोबस्त करत होते. पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाचे शहरातिल नागरिकांनी कौतुक केले आहे. मात्र दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने शहरातल्या पोलिस दलात मोठी चिंता वाढली आहे.