भाईंदर पश्चिम येथील मुर्धा गाव येथे राहणारे दीलीप बनसोडे गुरुवारी रात्री घरी जाताना त्यांच्यावर रस्त्यावर असलेल्या कुत्र्याने हल्ला केला असता कुत्र्यापासून बचाव करण्यासाठी बनसोडे बनसोडे यांनी या त्या कुत्र्याला दगड मारला या कारणावरून स्थानिक नगरसेविकेने बनसोडे यांच्या घरी जाऊन कुटुंबाला मारहाण केल्याची घटना मुळगाव परिसरात घडली आहे याप्रकरणी भाईंदर पश्चिम पोलीस ठाण्यात नगरसेविके विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दिलीप बनसोडे हे गुरुवारी रात्रीच्या दरम्यान घरी जात असताना त्याच्यावरती पाळीव असलेल्या व रस्त्यावर आलेल्या कुत्र्याने हल्ला केला या हल्ल्यामध्ये बनसोडे यांना कुत्र्याने चावा घेतला. त्यावेळी त्यांची पॅन्ट हि फाटली या कुत्र्यापासून आपली सुटका करून घेण्यासाठी त्याने कुत्र्याला दगड मारला त्यानंतर ते आपला बचाव करून बनसोडे ही आपल्या घरी गेले. काही वेळातच या परिसराच्या स्थानिक नगरसेविका नयना म्हात्रे या कुत्र्याला दगड मारण्याच्या कारणावरून बनसोडे यांच्या घरी गेल्या आणि घरातल्या मंडळींना शिवीगाळ करून मारहाण सुरू केली नगरसेविकेने बनसोडे यांच्या डोक्यात दगड मारला मार जबर लागल्याने दिलीप बनसोडे हे जखमी झाले. त्याला उपचारासाठी मिरा रोडच्या इंदिरा गांधी रुग्णालयात घेउन जाण्यात आले. याप्रकरणी भाईंदर पश्चिम पोलीस ठाण्यात नगरसेविका नयना म्हात्रे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार आला असून भारतीय दंड संहिता कलम 452, 324 ,504 व 506 नुसार या नगरसेविके विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.