मीरा भाईंदर शहरातील झोपडपट्टी भागात कोरोना पसरवतोय पाय

मीरा भाईंदर शहरातील झोपडपट्टी भागात कोरोना पसरवतोय पाय


मीरा भाईंदर शहरातला काही भाग या साथीचा हॉसपॉट बनत चाललेला आहे, तर झोपडपट्टी भागात ही शिरकाव सुरू झाल्यामुळे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे. आज दिवसभरात शहरात २१ रुग्ण मिळाले आहे. शहरातला झोपडपट्टी असलेला भागात कोरोनाचा शिरकाव न झाल्यामुळे झोपडपट्टी भाग सुरक्षित होता आता याही भागात या साथीने याही भागात पाय पसरवणे सुरू केल्यामुळे धोका अधिक वाढला आहे.



कोरोना संक्रमणचा भीषण काळ संपूर्ण जगावर घोंगावत असताांना. महामारीच्या संकटाने भारतात ही आणि महाराष्ट्रात या साथीने मोठी मुसंडी मारली आहे.  मीरा भाईंदर शहरात कोरोना रूग्णांची वाढती संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही तर उलट झोपडपट्टी भागात या साथीने शिरकाव केल्यामुळे शहरातील प्रशासनाची चिंता वाढवली आहे, 



विशेष म्हणजे आज मिळालेले कोरोनाचे हे रुग्ण मुंबईशी संबंधित असल्याची माहिती मिळते आहे. मीरा भाईंदर मनपा क्षेत्रात झोपडपट्टी भाग असलेला भाईंदरच्या गणेश देवल नगरात  ११ रूग्ण एकाच वेळी मिळून आले आहेत. या आधी  ही या विभागात ३ रुग्ण मिळून आले होते तर आंबेडकर नगर झोपडपट्टी मध्ये देखील रुग्ण मिळून आला होता.  भाईंदर मधील झोपडपट्टीत कोरोना विषाणूचा संसर्ग पसरत आहे.  


भाईंदर पश्चिम च्या गणेश देवल नगरमध्ये आज मिळून आलेल्या  ११ रुग्णां मध्ये ८ महिला तर ३ पुरुष आहेत. शहरातला आजचा कोरोना चे संक्रमण झालेला आकडा २१ आहे.
 
तर शहरातील उपचार घेऊन बरे झालेले १२ जण घरी गेले आहेत त्यामुळे शहरातील नागरिकांनी येणाऱ्या काळाची पावले ओळखून वागणे गरजेचे आहे फिजिकल डिस्टनसिंग ठेऊन वागणे गरजेचे आहे त्याच बरोबर स्वतः ची काळजी घ्यावी आणि कुटुंबाची सुरक्षा ही महत्त्वाची मनाने गरजेचे आहे तरच हा वाढत चाललेला कोरोना संक्रमणाचा आकडा आपण थांबवू शकतो अन्यथा कठीण काळ आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे.


 मीरा भाईंदर मानपात कोरोनाची लागण झालेली  ऐकून  संख्या  २८६ वर पोहचली आहे. तर  ७ जनांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.  आत्तापर्यंत १७२ नागरिक उपचारानंतर बरे झाले आहेत.