लॉकडाउन च्या तिसऱ्या टप्यात थोडी शिथिलता कोणत्या झोन मध्ये काय असेल सुरू सुविधा

लॉकडाउन च्या तिसऱ्या टप्यात थोडी शिथिलता कोणत्या झोन मध्ये काय असेल सुरू सुविधा


कोरोनाच्या संसर्गजन्य साथीला आळा घालण्यासाठी देशात ४० दिवसाचा लॉकडाउन दोन टप्यात घेण्यात आला, पहिला टप्पा २५ मार्च ते १४ एप्रिल  दुसरा टप्पा १५ एप्रिल ते ३ में आता ४ में ते १७ मे पर्यंत तिसरा टप्पा सुरू झाला आहे या टप्यात मात्र काही जीवनावश्यक सेवे व्यतेरीक्त काही सेवा सुरू करण्यासाठी थोडया प्रमाणात सीथिलता देण्यात आली आहे. जरी १७ मे पर्यंत लॉकडाउन सुरू असलातरीही काही व्यवसायांना या काळात मुभा दिली गेली आहे. त्यामुळे अनेक विभागात आता दुकाने सुरू होणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देताना म्हणाले की,काही व्यवसाय, काही खाजगी कार्यालये,सरकारी कार्यालाये सुरू करण्यात येणार आहेत त्याच बरोबर काही जिल्ह्यातील अंतर्गत बसेसची सेवा ही सुरू करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या झोन मध्ये काही   काही प्रमाणात सेवा सुरू होणार आहेत त्यामध्ये रेड झोन च्या वेगळ्या असतील तर ग्रीन आणि ऑरेंज झोन च्या सुविधा जवळपास सारख्याच सवरूपाच्या असतील.
या खालील स्वरूपाने देण्यात येणार आहेत यावरती एक नजर टाकूयात.


रेड झोनमध्ये खालील सेवा सुरू होणार?


प्रतिबंधक क्षेत्रा बाहेरची इतर दुकानं, दारुची दुकानं,मेडीकल, छोटे क्लिनिक,दवाखाने ,प्रतिबंधक क्षेत्रा बाहेर चारचाकी वाहनात चालकासह दोघांना मुभा प्रतिबंधक क्षेत्रात बाहेर  दुचाकीवर एका व्यक्तीला मुभा,सर्व वस्तुं, मालाचा पुरवठा
,उद्योग, शहरी उद्योग, सिटुची बांधकामे. जीवनावश्यक सेवांची दुकानं,ई-कॉमर्स सेवेतून मिळणाऱ्या वस्तू,खासगी कार्यालयांना 33 टक्के क्षमतेसह मुभा,सरकारी कार्यालयांमध्ये 33 टक्के क्षमतेसह,सर्व कृषीविषयक व्यवहार,बँक, वित्तसंस्था सुरू ,
कुरियर, पोस्टल सेवा सुरू राहणार


ऑरेन्ज आणि ग्रीन झोनमध्ये हे  होणार सुरू


प्रतिबंधक क्षेत्रा बाहेर इतर दुकानं, दारुची दुकानं,मेडीकल, छोटे क्लिनिक, दवाखाने,स्पा, हेअर सलूनलाही परवानगी,टॅक्सी कॅब सेवेला दोन प्रवाशांसह मुभा,चारचाकी वाहनात चालकासह दोघांना मुभा,दुचाकीवर एका व्यक्ती,सर्व वस्तुं, मालाचा पुरवठा,उद्योग,शहरी उद्योग, सिटुची बांधकामे,जीवनावश्यक सेवांची दुकानं,ई-कॉमर्स सेवेतून मिळणाऱ्या वस्तू खासगी कार्यालयांना व सरकारी कार्यालयांना पूर्ण क्षमतेसह मुभा,सर्व कृषीविषयक व्यवहार
बँक, वित्तसंस्था सुरू राहणार
कुरियर, पोस्टल सेवा सुरू राहणार आहेत.