कोरोना रोगाच्या साथी मुळे झालेला लॉक डाउन आणि त्यामध्ये अडकलेला सर्व सामान्य वर्ग,मजूर ,कामगार गरीब समुदाय अशा समुदायांना या संकट काळात मदतीचा हात देण्याच्या नावाखाली राजकारण्यांनी मात्र मदत कमी व चमकेश गिरी जास्त केलेली दिसून येत आहे. आपल्या तिजोरीतल्या लक्ष्मीला बाहेर न काढता आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम सर्रास केलेले दिसत आहे. मानवतेचे दर्शनदाखवण्यासाठी फुकटची चमकेगी करणारे मीरा-भाईंदर शहरातले चमको नेते आणि काही नगरसेवक चमकेगी करताना दिसत असल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये या लोकांविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर या चमकेश नगरसेवक आणि नेत्या वरती टीकेची झोड शहरातून उठताना दिसत आहे.
लॉकडाउनमध्ये अडकून पडलेल्या बेघर,कामगार,मजूर, गरीब समुदायाला आपल्या मूळ गावी जाण्यासाठी सरकारच्या माध्यमातून उपलब्ध केली जाणारी सुविधा म्हणजे त्यांच्या गावी जाण्यासाठी त्यांना केलेली बसेस व रेल्वेची सोय सरकारच्यावतीने करण्यात आलेली असतानाही त्याठिकाणी जाऊन काही आपणच सर्व करत आहोत असे दाखवणारे नेते मिरवताना दिसत आहे. त्याना या प्रक्रियेपासून दूर ठेवावे अशी भावना नागरिकांमध्ये उमटत आहे. आपल्या मूळ गावी जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस जेवण, बिस्किट, पाणी, मास्क, सॅनिटायजर असा वस्तू सोबत दिल्या जातात यासाठी पोलीस प्रशासन, मनपा कर्मचारी,सरकारची यंत्रणा व काही स्वयंसेवक निष्ठेने काम करत असताना आणि त्यांच्या प्रवास भाड्याचा खर्च मुख्यमंत्री निधीतून केला जात असताना अशा परिस्थितीत या शहरातले महापौर असो या नगरसेवक असो अन्य नेते असो आमदार-खासदार असो हे मात्र या श्रमिक रेल्वे (ट्रेन) सुटत असलेल्या किंवा जिथून प्रवाशांना सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत त्या ठिकाणावर जाऊन जणूकाही आपल्या कष्टाच्या मिळकतीतून आपण त्यांना त्यांच्या मूळ गावी पोहोचत आहोत असा अविर्भाव दाखवत फोटो व्हिडिओ बनवून आपल्या नावासह समाज माध्यमावर चमकेश गिरी करताना,प्रसिद्धी घेताना दिसत असल्यामुळे त्यांच्यावरती शहरातून टीका होताना दिसत आहे. या चमकेश खोरांना कोणीतरी आवरा अशी भावना व्यक्त केले जात आहे. सरकारच्या माध्यमातून लॉकडॉउन च्या काळामध्ये अडकलेल्यांना गरीब, गरजू, मजबूर,नागरिकांना केलेल्या मदतीचे फोटो, व्हिडिओ समाज माध्यमावर या ठिकाणी न प्रसिद्ध करण्यास मनाई आदेश असतानाही ही नेते मंडळी सर्रास त्याचे उल्लंघन करताना दिसत होती पण आता सरकारच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या मदतीमध्ये ही त्या ठिकाणी उपस्थित राहून ही मंडळी फोटो आणि व्हिडिओ बनवून समाज माध्यमावर टाकत आहेत. मनपा सत्ताधारी पक्षाचे काही नेते तर मुंबईच्या भागातून येऊन या श्रमिक ट्रेनने जाणाऱ्या मजुरांचा प्रती कनवळा दाखवण्याचा प्रयत्न करून फोटो काढून चमके गिरी करत आहेत.
रेल्वे (ट्रेन ) ची परवानगी देण्यासाठी केंद्र सरकार वीस ते पंचवीस पंचवीस दिवस लावत असतानाही त्यात सत्ताधारी पक्षाचे म्हणजेच भाजपाचे अनेक नेते या चमके गिरी मध्ये अव्वल ठरलेले दिसत आहेत. आपल्या खिशाला कोणतीही झळ न देता फुकटची प्रसिद्धी मिळविण्याचा त्यांचा हा डाव नागरिकांनी ओळखलेला दिसतो आहे. त्यामुळे त्यांच्यावर ती टीका होताना दिसत आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या भोजनात ही या लोकांनी चमकेश गिरी केली नगरपालिकेची जेवण पोहोचवले जात असताना त्या ठिकाणी ही चमकेश नेतेमंडळी पुढे पुढे करून जणूकाही जेवण मीच वाटत आहे असा अविर्भाव नागरिकांना दाखवत आहे. अनेकांनी तर त्याचे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर ते प्रसिद्ध केले तर आणि त्यांनी आपल्या फेसबुक पेज अन्य माध्यमातून हे लाइव्ह करण्याचा प्रयत्न केला या चमकेशगिरिला कुठेतरी आळा बसावा अशी भावना शहरातील सूज्ञ नागरिक करत आहेत. अनेक संस्थांच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याच्या सुविधा असतील किंवा अन्नदानाच्या सुविधा असतील या भोजनाची सुविधा असेल हे करत असताना काही स्थानिक नगरसेवकांनी, नेत्यांनी मात्र हे आपणच करत आहोत असा खोटा अविर्भाव दाखवून नागरिकांची फसवणूक चालवले यामुळे संताप वाढत चालला आहे. या प्रकारांना आळा बसावा म्हणून मनसेच्या अनु पाटील यांनी अशा लोकांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी सरकारकडे केली आहे तर काहीजण महानगरपालिकेकडून जेवण पुरवण्याचे टेंडर घेतलेली असतानाही ते मात्र आपणच जेवन पूर्णतः आपल्याच पदरमोडीतून देत आहोत जणू काही आपल्याच पदरचे देत आहोत असे वागत आहेत. त्याचा लेखाजोगा त्यांनी जनतेसमोर मांडावा असा प्रश्न आगरी समाज एकताचे एडवोकेट सुशांत पाटील यांनी उपस्थित केला आहे या संकट काळातील प्रसिद्धीसाठी हपापलेल्या या नगरसेवक व राजकीय नेत्यांना लगाम कसा लावणार असा प्रश्न नागरिक करताना दिसत आहेत. तर प्रशासनाच्या या उपाययोजनेचा कामालाही याचं लोकांमुळे अडथळा निर्माण होत असल्याच्या भावना काही सेवा देत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून ऐकायला मिळत आहेत खिशातलीदमडीही न खर्च करणारे नगरसेवक पण जनतेसाठी खूप काही करत असल्याचा दिखावा करणारे ड्रामेबाज नगरसेवक आणि नेते या शहरात फफुकटची प्रसिद्ध करून घेत आहेत. या नेत्यांना स्थानिक पातळीवर जनतेने ओळखले आहे हे नक्की.