महाराष्ट्रात  लॉकडाऊन चा चौथा टप्याचे संकेत

महाराष्ट्रात  लॉकडाऊन चा चौथा टप्याचे संकेतमहाराष्ट्रात  लॉकडाऊन चा चौथा टप्याचे संकेत


 कोरोनाचा विळखा तोडण्यासाठी  सरकारने उपाययोजना म्हणून संचारबंदी व लॉकडाउन संपूर्ण देशात केले हा लॉकडाउन आता पर्यंत तीन टप्यात घेण्यात आला आहे. परत आता चौथा टप्पा ही लॉकडाउन येणार आहे असे संकेत मिळत आहेत. राज्य सरकारने घेतलेल्या बैठकीत लॉक डाउन वाढवण्या संदर्भात चर्चा केली गेली आहे आणि यावर  बैठकीत एकमत झाले असल्याची माहिती मिळते आहे.


देशात कोरोना साथीमुळे देशात लॉकडाउन चा तिसरा टप्पा काही दिवसात संपणार आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या थांबताना दिसत नाही दररोज कोरोनाचे मिळणारे रुग्ण आणि वाढता प्रसार लक्षात घेता  राज्यात राज्य सरकारने लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय  घेतला असल्याचे समजत आहे. आता राज्यात लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्याबाबत महाविकासआघाडीच्या बैठकीत चर्चा झाली आहे. या बैठकीत सर्वांचं लॉकडाउन वाढवण्यावर ठाकरे सरकारचे एकमत झालं असल्याची माहिती मिळाली आहे.


तसेच १७ मे नंतर लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यावर या बैठकीत सहमती झाली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या मंत्र्यांच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली