पाच दशके लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या स्टार अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप
पाच दशकांपर्यंत लोकांच्या हृदयावर राज्य करणारे बॉलिवूड स्टार अभिनेता ऋषी कपूर यांनी गुरुवारी जगाला निरोप दिला. चित्रपट क्षेत्रात काम करत असताना अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेले होते . ४ सप्टेंबर १९५२ रोजी त्यांचा जन्म झाला, १९८० साली ते विवाहबंधनात अडकले आणि आज ३० एप्रिल २०२० रोजी वयाच्या ६७ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांची चित्रपट दुनयेतली सुरवात १९७० मध्ये 'मेरा नाम जोकर' या त्यांच्या पहिल्या चित्रपटात झाली आणि बालकलाकाराच्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.व
अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक असे अनेक कामे केली आहेत.
अनेकांच्या हृदयात राज करणारे ऋषी कपूर बर्याच वर्षांपासून कर्करोगाने ग्रस्त होते, हसरा चेहरा आणि मनमिळाऊ स्वभावाने अनेकांची मन जिंकणारे अभिनेते होते. कर्करोगा झुंज देत असतांनाही ऋषी कपूरने कधीही त्यांच्या चेहऱ्यावर निराशा येऊ दिली नाही. श्री. ऋषी कपूर आयुष्याच्या शेवटच्या दिवसांतही नेहमी हसत राहिले. तो एक प्रामाणिक आणि आनंदी व्यक्ती होते. जगातून ऋषी कपूरच्या निधन झाल्याची निरोपाची बातमी मीडिया मधून येताच त्याच्या चाहत्यांमध्ये निराशा पसरली. ऋषी कपूर यांना अश्रू वाहून श्रद्धांजली वाहिताना चाहत्यांनी त्यांचे दुःख फेसबुक आणि सोशल मीडियावर शेअर केले. बुधवारी रात्री ऋषि कपूर यांना श्वास घेण्यात त्रास झाला, त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी, ऋषी कपूर यांची पत्नी नीतू , भाऊ रणधीर कपूर आणि कुटुंबातील अन्य सदस्य रुग्णालयात उपस्थित होते.
नंतर दुपारी ऋषी कपूर यांच्यावर चंदनबाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले, ज्यात केवळ काही लोकांना हजर राहण्याची परवानगी होती.देशात सुरू असलेल्या लॉकडाउन मुळे ऋषि कपूर यांची मुलगी रिद्धिमा ही आपल्या वडिलांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी शेवटचा निरोप देण्यासाठी रिद्धीमा दिल्लीवरून मुंबईला येऊ शकली नाही, रणबीर आणि नीतूशिवाय आलिया आणि करीना उपस्थित होते.नुकतेच अभिनेता इमरान खान यांचे निधन झाले. आणि आता ऋषी कपूर यामुळे हा आठवडा चित्रपटसृष्टी साठी वाईट स्वप्ना सारखा आला आहे अशीच भावना व्यक्त होत आहे.