गावी जाण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राची आता गरज नाही 

गावी जाण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राची आता गरज नाही


कोरोनाचा शिरकाव रोखण्यासाठी सरकारने अचानकपणे देशात लागू केलेला लॉकडाउन यामुळे देशात अनेक भागात कामानिमित्त गेलेले नागरिक अडकून पडले आहेत. त्याच बरोबर मीरा-भाईंदर मध्येही अनेकजण अडकलेले आहेत अशा नागरिकांना त्याच्या गावी त्यांना पोहचविण्यासाठी सरकार पावले उचलत आहे.
 राज्य शासनाच्या आदेशानुसार मिरा भाईंदर महानगरपालिका सुधारित मार्गदर्शन सूचना काढण्यात आल्या आहेत. 
इतर परराज्यातील मिरा भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये अडकलेले कामगार, मजूर, बेघर व्यक्ती, पर्यटक व इतर व्यक्ती यापैकी जे आपल्या राज्यात रेल्वेने / बसने परत जाण्यास इच्छुक आहेत, अशा व्यक्तिंनी महानगरपालिकेने विहीत केलेल्या नमुन्यात पूर्ण अर्ज भरुन वैद्यकीय प्रमाणपत्रासह जमा करणेबाबत यापूर्वी सूचित करण्यात आले होते. पण आता प्राप्त झालेल्या राज्य शासनाच्या नवीन आदेशानुसार वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र देण्याची अट रद्द करण्यात आली आहे.


कोरोना साथीची देशात उसळलेली लाट, शहरात पडत चाललेला या विषाणूचा विळखा या मुळे शहरातला घाबरलेला प्रत्येक  व्यक्ती हा कोरोना रोगाच्या भितीने मूळ गांवी जाऊ पाहात आहे. त्या साठी सरकारने दिलेल्या सूचना, नियम याचे धिंडवडे उडवत फिजिकल डिस्टटन्स न ठेवता गावी जाण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रे मिळवण्यासाठी धडपडत आहे. डॉक्टर च्या क्लिनिक, दवाखाने येथे लांबलचक रांगा लागल्या होत्या. त्यात अनेक ठिकाणी या प्रमाणपत्रासाठी १०० ते २०० रुपये घेतले जाऊ लागल्या च्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या यात मजबुरीत अडकलेल्या नागरिकांची लूट करणारे प्रकार ही घडले आहेत . या प्रकारांना आळा घालण्यासाठी लांबचलांब लागणाऱ्या रांगा थांबवण्यासाठी सरकारने डॉक्टरांचे अर्जा सोबत जोडावे लागणारे आरोग्य चाचणी चे प्रमाणपत्र न देण्याचा निर्णय घेतल्या मुळे रांगा कमी होतील अशी अपेक्षा आहे.
मिरा भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये अडकलेले कामगार, मजूर, बेघर व्यक्ती, पर्यटक व इतर व्यक्ती यापैकी जे आपल्या राज्यात रेल्वेने / बसने परत जाण्यास इच्छुक आहेत, अशा व्यक्तिंना आयुक्त, मिरा भाईंदर महानगरपालिका यांचेमार्फत आवाहन करण्यात आले आहे की
नविन आदेशानुसार,सुचनांनुसार अडकून पडलेल्या प्रवाशांना आता स्वतंत्र वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याने महानगरपालिकेतील वैद्यकीय अधिकारी किंवा खाजगी वैद्यकीय व्यवसायिक(डॉक्टर) यांचेकडून वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी रांगा लावू नयेत. ज्या दिवशी प्रवासा ची तारीख असेल जेथून प्रवास सुरू होणार आहे त्या ठिकाणी अशा व्यक्तींची एकत्रित वैद्यकीय चाचणी केली जाईल. त्यामुळे 
  अशा व्यक्तींनी आता फक्त विहित नमुन्यातील अर्ज भरून  सोबत आधार कार्डाच्या सत्यप्रतीसह जोडून ते सध्या राहत असलेल्या भागातील पोलीस स्टेशनमध्ये  जमा करावा असे मनपा जनसंपर्क अधिकारी यांच्याकडून सांगण्यात येत आहे.