मीरा-भाईंदर करानो आता तरी व्हा सावध, कोरोना ग्रस्तांचा ३१२ आकडा 

मीरा-भाईंदर करानो आता तरी व्हा सावध, कोरोना ग्रस्तांचा ३१२ आकडा


मीरा-भाईंदर शहरामध्ये कोरोनाने धुमाकूळ घालणे सुरू केले आहे. दररोज झपाट्याने वाढणारी रुग्णांची संख्या शहरात पाहता आता तरी सावध होणे गरजेचे आहे. शहरातल्या कोरोनाच्या रुग्ण संख्येने तीन शतके पार केली आहेत मनपाच्या रिपोर्ट नुसार आतापर्यंत शहरात ३१२ रुग्ण आढळून आले आहेत.


लॉकडाउन मध्ये होताचे काम बंद  आहे. जगण्यासाठी लागणारा पैसा नाही बैचेन नागरिक कामधंधाच्या शोधत आहे. कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून काही जण धडपड आहेत तर काही जण आपले सवई पूर्ण करण्यासाठी मोकाट फिरत आहेत. त्यामुळे मीरा-भाईंदर शहरातील वाढत चालले रुग्णांची संख्या ही शहरवासीयांसाठी चिंता वाढवणारी बाब आहे. शहरात १००% लॉकडाउन ठेऊन ही रुग्ण वाढीत फरक पडलेला दिसत नाही. मूळ गावी जाण्यासाठी कामगारांची धावपळ या मुळे शहरात फिजिकल डिस्टन्स चा बोजवारा उडतो आहे. नागरिकांत या बाबीचे गांभीर्य दिसून येत नाही. आज ही शहरातील नागरिकांना त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. शहराने कोरोना ग्रस्तांचा आकडा तीनसे  पार केलाआहे. सध्या शहरात कोरोनाची लागण झालेले एकूण रुग्ण ३१२ वर पोहचले आहेत तर  आज एकाच मृत्यू झाला आहे. शहरातील आजची कार्यरत कोरोना रुग्णांची संख्या ९० झालेली आहे, तर ९ कोरोना ग्रस्त रुग्णांचा मृत्य झाला आहे. आज दिवसभरात ११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर शहरात बरे होऊन घरी जाणाऱ्यांची एकूण संख्या २१३ आहे.


२१ रुग्ण आज मिळून आलेल्या नवीन रुग्णामध्ये १४ पुरुष व ७ महिलेचा समावेश आहे. यात  मिरारोड पूनम सागर कॉम्प्लेक्स भागात-४, न्यु म्हाडा -२, काशीमीरा, पेनकरपाडा, इडनरोझ,शांती पार्क,भारती पार्क, आयडील पार्क दीपक रुग्णालया जवळ प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे.भाईंदर मध्ये  गणेश देवल नगर-२ हनुमान नगर, ६०फूट मार्ग,जेसल पार्क, शिवसेना गल्ली, कोपु महल येथे प्रत्येकी रुग्ण सापडला आहे. नवघर मार्गावरील आज ३८ वर्षीय असलेल्या लेखापाल पदावर काम करणाऱ्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


आज सापडलेल्या रुग्णां मध्ये बहुतेक रुग्ण हे मुंबईत खाजागी कंपनी मध्ये कामाला आहेत तर या व्यतिरिक्त काही औषध विक्रेते, गृहिणी, आंबा विकते,शिक्षक, टेलर,आया,गॅस शेगडी मेकॅनिक आहेत तर शहरातील नागरिकांनी सावध होणे गरजेचे आहे. वेळीच काळाची पावले ओळखा आणि या कोरोना साथीला रोखा नाहीतर शहराला गंभीर परिणाम भोगावे लागतील हे लक्षात घ्या कामाव्यतरिक्त बाहेर नाणे टाळा.