मीरा-भाईंदर मनपाच्या महापौर ज्योत्स्ना हसनाळे ह्या त्यांच्याच प्रभागातील अवैद्य बांधकाम रोखण्यासाठी ठरल्या अपयशी

मीरा-भाईंदर मनपाच्या महापौर ज्योत्स्ना हसनाळे ह्या त्यांच्याच प्रभागातील अवैद्य बांधकाम रोखण्यासाठी ठरल्या अपयशी


 


मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 14 च्या नगरसेविका तथा मीरा-भाईंदर चा महापौर ज्योत्स्ना हसनाळे या त्यांच्या प्रभागातील अनधिकृत बांधकाम रोखण्यासाठी अपयशी ठरल्याची चर्चा शहरात सुरू आहे एकीकडे देश राज्य आणि शहर कोरूना च्या महा संकटाशी सामना करत असताना भू माफिया आणि चाळ माफियांनी प्रभाग क्रमांक 14 मध्ये स्थानिक नगरसेवक आणि प्रभाग अधिकारी व इंजिनीयर यांचा आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांचा सिलसिला सुरूच ठेवला आहे त्यामुळे या परिसरात या अनधिकृत बांधकामाची चर्चा जोर धरत आहे.


 


मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्र हे मुंबईला लागूनच असल्यामुळे या शहरात  नागरीकरणाची प्रक्रियाही तेवढ्याच तेजीने वाढत आहे. शहराची वाढती लोकसंख्या त्याचबरोबर चाळीच्या वस्त्यांचा वाढता भडीमार, शहरावर वाढून नागरी मूलभूत सुविधांचा अभाव निर्माण होतो आहे. तर या वाढत्या लोकसंख्येमुळे शहराला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे . प्रभाग क्रमांक 14 हा मुंबई-अहमदाबाद महामार्गावर लगत असलेला भाग आहे या भागांमध्ये मूळचा रहिवासी असलेला आदिवासी समुदाय आणि त्यांच्या छोट्या छोट्या न स्वरूपाचे पाडे म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठिकाणे आहेत त्यांच्या उदरनिर्वाहासाठी असलेली शेतजमीन ही शेतजमीन भूमाफियांनी कवडीमोल भावाने खरेदी करून त्याचबरोबर हा परिसर राष्ट्रीय वनविभागाच्या सीमेलगत असल्यामुळे अनेक नैसर्गिक नाले, खदानी, मोठमोठे खड्डे ,या परिसरात पाहायला मिळत होते त्या नैसर्गिक असलेल्या नाल्यात खड्ड्यांमध्ये आणि खदानीत या भूमाफियांनी माती भराव करून ते खड्डे जमिनी तारखे तयार केले आणि त्यावरती अवैद्य चाळी वाढण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू झाले. धारावी सारखी चाळींची वस्ती या परीसरात जोर धरत आहे . अनेक पक्या बांधकामाचा चाळीच्या चाळी या परिसरात उभ्या टाकत आहेत. आदिवासींचा अशिक्षित पणाचा फायदा या भूमाफियांनी घेत त्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने विकत घेऊन या जमिनीवरती अनेक चाळी उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे हा प्रभाग क्रमांक 14 चा परिसर मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातल्या अनधिकृत बांधकामां हे माहेरघर बनलेला प्रभाग आहे. या परिसरामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रभाग अधिकारी व काही वरिष्ठ अधिकार्‍यांचा आशीर्वादामुळे अनेक अवैध बांधकामे उभी राहत आहेत. हजारो तक्रारी प्रभाग कार्यालयात धूळखात पडलेले असतात मन मर्जीप्रमाणे प्रभाग अधिकारी स्थानिक लोकप्रतिनिधींना हाताशी धरून काही मोजकीच बांधकामे तोडण्याचा ड्रामा हे अधिकारी करतात तर आर्थिक हितसंबंध जोडले आहेत अशांचे अवैध बांधकाम मात्र रक्षणा करून वाचवली जातात यामुळे हा परिसर अनधिकृत बांधकामाच्या विळख्यात आलेला आहे.


 


एकीकडे देश कोरोना महामारी रोगाच्या साथी सी झुंज देत आहे तर दुसरीकडे प्रभाग अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी अनाधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफिया आणि चाळमाफियाच्या अवैध बांधकामांना संरक्षण देत आहेत असे चित्र निर्माण आहे झाले आहे. या परिसराच्या नगरसेविका सध्याच्या महापौर असलेल्या ज्योत्स्ना हसनाळे यांना वारंवार निदर्शनास आणून देऊनही कारवाई होताना दिसत नाही यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली असता त्यांच्याकडून एकच सांगण्यात येतं की अधिकारीवर्ग ऐकतच नाही यामुळे सर्वसामान्याच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे  की, जर अधिकारीवर्ग महापौरांचे ऐकत नसतील तर सर्वसामान्यांचे काय ? हा प्रश्न नागरिक विचारताना दिसत आहे


 


महापौर हसनाळे यांच्या वॉर्डातल्या या काळात सुरू असलेल्या अनधिकृत बातम्या बांधकामांच्या बातम्या वृत्तपत्रांनी प्रसिद्ध करताच महापौराना जाग आली आणि आपली जबाबदारी झटकण्यासाठी त्यांनी यासंदर्भात संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांना कारवाईसाठी पत्र दिले संबंधित अधिकाऱ्यांच्या व्हाट्सअप वर अनाधिकृत बांधकामाची फोटो ही पाठवले. पत्र देऊनही कारवाई मात्र त्या बांधकामावर ती झालेली नाही त्याउलट ही बांधकामे जोमाने सुरू आहेत या पाठीमागे नेमका हात कोणाचा या प्रश्नाचे उत्तर या परिसरातील जनतेच्या चर्चेतून शोधण्याचा प्रयत्न केला असता असे लक्षात येत आहे की, या परिसरातील भूमाफिया व चाळ माफिया यांना अवैध बांधकामें उभी करायची असतील तर काम सुरू करण्यापूर्वी ते लोकप्रतिनिधींना आणि अधिकाऱ्यांना भेटूनच ही बांधकामे सुरू करतात त्यामुळे त्यांची बांधकामे तूटत नाही अशी भावना नागरिकांमधून ऐकायला मिळाली सर्वसामान्य माणूस आपल्या घराच्या ओटाल्यावरती दोन वीट लावण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्याचा ओठला सोडला जातो पण या माफियांची ही अवैध बांधकामे तोडली जात नाही. खरे तर हे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याचा परिणाम आहे असे या परिसरातील नागरिक बोलताना आढळून आले आहेत. त्यामुळे स्पष्ट होत आहे की या अनधिकृत बांधकामांना वाचवण्यात आणि अवैध बांधकामांना संरक्षण देण्यात स्थानिक लोकप्रतिनिधी व महानगरपालिकांच्या अधिकाऱ्यांचा पाठिंबा असल्यामुळेच इथे अवैध बांधकामें दिवसेंदिवस उभी राहत आहेत.


मीरा भाईंदर च्या महापौर जर स्वतःचा वार्डातील अनाधिकृत बांधकाम थांबवण्यात अपयशी ठरत असतील तर त्या शहरातले अनधिकृत बांधकाम कसे थांबवणार या निष्क्रिय पणाच्या कारभारामुळे शहरात अनधिकृत बांधकामाचे स्तोम नक्कीच वाढणार अशी नागरिकांना भीती वाटत आहे. त्यामुळे महापौर ज्योत्स्ना हसनाळे आपल्या वार्डातील अनधिकृत बांधकाम थांबवण्यासाठी अपयशी ठरले आहे असेच म्हणावे लागेल.