मीरा-भाईंदर मध्ये कोरोना रुग्णांचा आकडा गेला ७३८ पार आज एकाच दिवशी ८९ रुग्ण तर ५ जनांचा कोरोनाने घेतला बळी
मीरा- भाईंदर शहरात मिळून आलेले पुरणाचे रुग्ण हे शहरातील चिंता वाढवणारे आणि शहरातील नागरिकांच्या मनामध्ये धडकी भरवणारे आहेत आज आता फ्रेंड मिळून आलेल्या रुग्णांच्या संस्थेचे रेकॉर्ड मोडणारे आजचे आकडे आहेत त्यामुळे शहरी कोणाच्या बुडाखाली जात आहे का अति शंका शहरवासीयांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. या दिवसेंदिवस अधिकाधिक होत असलेल्या परिस्थितीला कोण जबाबदार कोण प्रशासनाची फेल झालेली उपायोजना ? की नागरिकांची निष्काळजी पणा ची कृती ? या प्रश्ना सध्यातरी शहरातील नागरिकांच्या मनात येत आहे.
देशाला कोरोनाव्हायरसने मगरमिठी मारलेली असतानाच उपाय योजनेचा भाग म्हणून देशात लॉक डाऊन जाहीर केला गेला. संपूर्ण देश गेल्या अनेक दिवसापासून लॉक डाउनखाली बंदिस्त झालेला असतानाच त्यात अडकलेल्या अनेक कामगार, मजूर, विद्यार्थी, पर्यटक यांची हेळसांड झाली आहे. पण कोरोना विषाणू थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही देशात वाढत चाललेला कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे तर मीरा भाईंदर ची स्थिती दिवसेंदिवस खराब होताना दिसत आहे. गेल्या पंधरा दिवसापासून शहरात कोरोना विषाणूने थयथयाट सुरू केला आहे. कोरोनाचा विषाणू या छोट्याश्या शहरात सैराट झालेला पाहयेला मिळत आहे. त्यामुळे कोरोना रुग्ण हे झपाट्याने वाढत आहेत -भाईंदर शहरात आत्तापर्यंत मिळणाऱ्या रुग्ण संख्या वाढीचा विक्रम आज मोडीत निघाला आहे. आज मिळून आलेल्या रुग्णांच्या संख्येकडे पाहतात धडकी भरवणारा हा आकडा भविष्यातली चिंता काय असल्याचे संकेत देणार आहे असे अनेक नागरिकांना वाटते आहे. त्यामुळे शहरातली नियोजन फेल तर झाले नाही ना असा प्रश्न मनात निर्माण झालेला दिसतो आहे. त्यामुळे शहरातील वाढत्या गर्दीवरती आणि उपाय योजनावर भर देणे सध्याच्या परिस्थितीला गरजेचे आहे. जर असेच नियोजन केले गेले तर भविष्यात या महामारिच्या संकटापासून शहराला वाचवणे कठीण होऊन बसेल अशी भावना सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त होताना दिसत आहे
मायानगरी आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहराला लागूनच असलेल्या छोट्याशा महानगरपालिकेच्या क्षेत्रांमध्ये कोरोना रुग्ण मिळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मागील काही दिवसात रुग्ण मिळण्याचे प्रमाण फार वेगाने वाढत आहे.आज मीरा-भाईंदर शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण मिळाल्या पासून ते आज पर्यंत दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. सध्या शहरात आजचा कोरोना रुग्णांचा आतापर्यंत चा आकडा हा ७३८ वर गेलेला आहे तर कोरोना लागण झाल्यामुळे मृत्यू झाल्याची संख्या ही २९ वर गेली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पण ठीक आहे आता पर्यंत ठीक झालेल्या रुग्णांची संख्या ही ४२४ आहे . सद्या शहरात ऍक्टिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या ही २८५ आहे. आत्तापर्यंत शहरातले सगळे रेकॉर्ड ब्रेक करून आज शहरात तब्बल ८९ रूग्ण मिळाले तर मीरा-भाईंदर शहरातआजच्या एकाच दिवशी ५ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे शहरात चिंता अधिक वाढली आहे. सध्याच्या परिस्थितीला हा आकडा मनात धडकी निर्माण करणारा ठरला आहे. याकडे पाहता नागरिकांनी सतर्क होऊन या कोरोनाच्या जीवघेण्या महामारी संकटाचा सामना जागरूकपणे करणे गरजेचे आहे, निष्काळजी करून असेच रुग्णांची संख्या वाढत गेले तर संपूर्ण शहर कोरोनाच्या विळख्यात यायला वेळ लागणार नाही म्हणून प्रत्येक शहरवाशीयांनी जागृत होऊन जागरूक पणे व्यवहार फिजिकल डिस्टन्स ठेवून करणे गरजेचे आहे. अनावश्यकपणे फिरणे टाळले पाहिजे जेणेकरून या महामारीला आळा घालता येईल अत्यावश्यक कामा शिवाय रिकामे फिरणे म्हणजे कोरूना ला निमंत्रण देण्यासारखेच आहे. म्हणून जागरूक नागरिकांनी अनावश्यकपणे फिरण्याचा मोह टाळावा आणि शहराला या महामारी पासून वाचवावे अशी आम्ही आपणास या वृत्ताच्या माध्यमातून विनंती करत आहोत