मिरा- भाईंदर शहराला अर्धवट नालेसफाईमुळे वाढला धोका

देशात, राज्यासह शहरात सुरू असलेले कोरोना साथीचा धोका वाढत चाललेला आहे तर शहरातील मुख्यानाल्यांची नाले सफाई न झाल्यामुळे शहराला तोंडावर आलेल्या पावसाळ्यातला पावसाचा धोका ही अधिक प्रमाणात वाढला आहे. शहरातील अनेक भागात पाणि घुसणार आणि जनजीवन विस्कळीत होणार कोरोनाच्या संकटा बरोबरच अनेक संकटे शहरात उभे राहणार याची भिती शहरातील विविध भागातील नागरिकांना वाटू लागली आहे. त्यामुळे भविष्यात अधिक धोकादायक परस्थितीचे चित्र उभे राहते की काय अशी शंका तर आजच्या स्थितीला निर्माण झाली आहे.


मिरा-भाईंदर शहरातील नागरिक  एकीकडे कोरोनाच्या साथीसी झुंज देत आहेत तर शहरातली अर्धवट असलेली नालेसफाई आणि जे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून येणारे नैसर्गिक नाले हे मोठ्या प्रमाणात आहेत. या नाल्यामध्ये जंगल असलेल्या भागातून माती, खडक, कचरा वाहून येत असतो या नाल्यांची सफाई होणे गरजेचे आहे पण हे नाले साफ आता पर्यंत झाले नाहीत. महानगर पालिका प्रशासन दर वर्षी या नालेसफाईच्या साठी खाजगी कंपन्यांना ठेका देते पण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नालेसफाईचे तिनतेराच झालेले पहावयास मिळालेले आहे. अनेक मोठं मोठे नाले आजही साफ सफाई करण्यासाठी ठेकेदाराने हातच लावला नाही त्यामुळे नाल्यात गाळ, माती, दगड, कचरा तसाच पडून आहे. या नाल्याकडे मनपा अधिकाऱ्यांनीलक्ष देणे आवश्यक होते पण अधिकारी मात्र दुर्लक्ष करत आहेत असेच सध्याचे चित्र आहे. काशिमीरा भागात व इतर भागात ही मोठया प्रमाणात मातीभराव झालेला आहे त्याच बरोबर अनेक ठिकाणी नाले अरुंद झाले आहेत तर बऱ्याच ठिकाणी नाल्यालगत अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात झाले आहेत त्यामुळे  हे नाले साफसफाई करणारे यंत्रणा तिथे जाऊ शकत नाही तर बऱ्याच भागात नाल्यावर व मोठमोठ्या गटारावर स्लाब टाकल्या मुळे त्यातला गाळ हा माणसे लावून काढावा लागतो तेव्हा ते साफ करता येते पण असे या वर्षीच्या ठेकेदाराकडून केले गेले नसल्याने यावर्षी या नाल्यातील तुंबलेले पाणी लोकांच्या घरात येणार आणि जनजीवन विस्कळीत करणार यात काही शंका वाटत नाही. अपूर्ण असलेली नाले सफाई ही शहरासाठी भविष्यात धोकादायक ठरू शकते असे अनेक जाणकार भावना व्यक्त करत आहेत. 


मिरा भाईंदर शहराला काही भाग समुद्र किनारा आहे तर काही भागाला खाडीने वेढलेला आहे,शहराच्या पूर्वेला सम्पूर्ण डोंगराळ भाग आहे , या भागात राष्ट्रीय जंगल आहे आणि या भागातून पावसाळ्यात पावसाचे पाणी येण्याचे प्रमाण ही अधिक असते त्यामुळे शहरात पावसाळ्यात शहरातील विविध भागात जलमय परिस्थिती उदभवते या वर्षी याचे प्रमाण अधिक होणार कारण पावसाळ्यापूर्वी जी नालेसफाई होणे अपेक्षित होते ती झाली नाही त्यामुळे हा धोका अधिक संभवतो आहे म्हणून प्रशासनाणे लक्ष देणे गरजेचे आहे. पण ठेकेदाराला अभय देणारे अधिकारी मात्र या अपुऱ्या नालेसफाई बाबत मूग गिळून गप्प बसले आहेत.


मिरा-भाईंदर शहरातले सत्ताधारी आणि विरोधक ही ब्र काढायला तयार नाहीत शहरातील स्थानिक लोकप्रतिनिधी ना हे वास्तव दिसत नाही का ?  हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे शहरातील जनतेला शंका यायला लागली आहे की, अधिकारी, ठेकेदार,सत्ताधारी, व विरोधक याचें नालेसफाईत मिलिजुली सरकार आहे का ? शहराला दोन दोन आमदार असताना ही त्यांचा ही आवाज ऐकू येत नाही त्यामुळे नालेसफाई कडे कोणाचे लक्ष नाही का ही भावना तयार होत आहे की, जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जर असंच कामकाज सुरू राहिले तर हे शहर पाण्याखाली गेले तर जबाबदार कोण याचे उत्तर मात्र जनतेला या शासनाला, सत्ताधाऱ्यांना,आणि विरोधकांना पण या जनतेला द्यावे लागेल अन्यथा या शहरातली जनता माफ करणार नाही. आता हे पाहावे लागेल की या प्रकरणी राजकीय नेते किती जागरूक आहेत.